बंडू आंदेकरच्या आर्थिक नाड्या आवळल्या, पोलिसांनी उचललं मोठं पाऊल?

On: September 16, 2025 1:06 PM
Andekar Gang
---Advertisement---

Bandu Andekar | आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकर (Bandu Andekar) याच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून त्याच्या आर्थिक साम्राज्यावर घाव घालण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या रेडमध्ये कोट्यवधींचा ऐवज हाती लागल्यानंतर आता महापालिकेनेही थेट त्याच्या प्रमुख कमाईच्या स्रोतावर कारवाई केली आहे.

घरावर टाकलेल्या रेडमध्ये काय सापडलं? :

काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने बंडू आंदेकरच्या (Bandu Andekar) घरावर झडती टाकली. या कारवाईत पोलिसांच्या हाती ६७ लाखांचे सोन्याचे दागिने, मोठ्या प्रमाणावर चांदी, २ लाख ५० हजारांची रोकड, एक अलिशान कार, करारनामे, कर भरल्याच्या पावत्या आणि जमीन व्यवहाराच्या इसार पावत्या लागल्या. हा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी आंदेकरची मालमत्ता ताब्यात घेतली.

बंडू आंदेकरचा एक मोठा आर्थिक स्त्रोत म्हणजे पुण्यातील गणेश पेठेतील बेकायदेशीर मासोळी बाजार. या बाजारातून त्याला मोठा आर्थिक फायदा मिळत असे. पण महापालिकेने या बाजारावर कारवाई करून त्याचे प्रमुख उत्पन्नाचे साधन बंद केले आहे. या कारवाईनंतर आंदेकरच्या आर्थिक नाड्या चांगल्याच आवळल्या गेल्याचे मानले जात आहे.

Bandu Andekar | कुटुंबीयांचे आरोप :

सुनावणीदरम्यान आंदेकरच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी धमक्या दिल्या असून, “कृष्णा आंदेकर हजर झाला नाही तर त्याचा एन्काऊंटर करू” अशी भीती दाखवण्यात आली होती. मात्र, पोलिसांकडून त्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हा खून वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचलेल्या कटाचा भाग असल्याचे समोर आले आहे. वनराज आंदेकर (Vanraj andekar)  यांना मारणारा आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर (वय 19) याला 12 गोळ्या झाडून ठार करण्यात आले. आयुषचा गुन्हेगारी विश्वाशी काहीही संबंध नसताना त्याची हत्या झाली.

पोलिस तपास आणि पुढील दिशा :

या प्रकरणातील आरोपी अमन पठण, सुजल मिरगु, वृंदावणी वाडेकर आणि तिच्या दोन्ही मुलांवर कारवाई सुरू आहे. मकोका न्यायालयाने आरोपींना १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, बंडू आंदेकरच्या आर्थिक साम्राज्यावर केलेल्या कारवाईमुळे पोलिसांचा तपास अधिक वेगाने पुढे सरकत आहे.

News Title: Ayush Komkar Murder Case: Police Tighten Grip on Bandu Andekar’s Finances, Illegal Fish Market Sealed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now