रिक्षाने प्रवास करण्याआधी ‘ही’ बातमी नक्की वाचा!

On: March 14, 2026 1:10 PM
Auto Rickshaw Fare Hike
---Advertisement---

Auto Rickshaw Fare Hike | राज्यात (Maharashtra) सध्या एलपीजी (LPG) गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. या परिस्थितीचा परिणाम रिक्षा चालकांवरही झाला असून गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे त्यांनी भाड्यात वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांवर आता महागाईचा आणखी एक अतिरिक्त भार पडला आहे.

गॅस टंचाईमुळे रिक्षाचालकांची अडचण वाढली :

राज्यात अनेक ठिकाणी गॅसची कमतरता असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारकडून गॅस पुरेसा असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सींसमोर मोठी गर्दी दिसून येत आहे. नागरिक पहाटेपासून सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे राहत आहेत. ऑनलाईन बुकिंग प्रक्रियेतही अडचणी येत असल्यामुळे अनेकांना सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम रिक्षा चालकांवरही झाला आहे.

जळगाव (Jalgaon) शहरातील इच्छा देवी चौक परिसरात असलेल्या एलपीजी गॅस पंपावर रिक्षांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शहरात एकूण तीन गॅस पंप असताना त्यापैकी दोन पंपांवरील गॅस संपल्याने सध्या फक्त एकच पंप सुरू आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना गॅस भरण्यासाठी दोन ते तीन तासांपर्यंत रांगेत थांबावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एवढा वेळ प्रतीक्षा केल्यानंतरच त्यांना गॅस मिळत असल्याने रिक्षा व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे.

Auto Rickshaw Fare Hike | गॅस दरवाढीमुळे भाडेवाढ, हॉटेल व्यवसायालाही फटका :

गॅस टंचाईसोबतच एलपीजीच्या दरात झालेली मोठी वाढ रिक्षा चालकांसाठी आणखी एक अडचण ठरली आहे. यापूर्वी गॅसचा दर किलोमागे सुमारे 55 रुपये होता, मात्र सध्या तो वाढून जवळपास 90 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. या अचानक झालेल्या वाढीमुळे रिक्षा चालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. खर्च वाढल्यामुळे त्यांनी प्रवासभाड्यात वाढ केली असून त्यामुळे सामान्य प्रवाशांना दुहेरी आर्थिक फटका बसत आहे.

दरम्यान, इगतपुरी (Igatpuri) शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरची कमतरता निर्माण झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) असलेल्या अनेक हॉटेलमध्ये गॅस उपलब्ध नसल्याने स्वयंपाकासाठी चुलीचा वापर सुरू करण्यात आला आहे. काही हॉटेल मालकांनी मेनूमधील पदार्थ कमी केले आहेत, तर काहींनी तात्पुरते हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच काही हॉटेल बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.

याचदरम्यान राज्यातील रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली आहे. मात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईक यांना मोटार वाहन विभागाकडे नोंदणी करून परवाना घेणे अनिवार्य करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

News title : Auto Rickshaw Fare Hike Due to LPG

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now