पहलगाम हल्ल्यानंतर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता पोहोचला काश्मीरमध्ये; पर्यटकांना केलं महत्त्वाचं आवाहन

On: April 28, 2025 12:19 PM
Atul Kulkarni
---Advertisement---

Pahalgam | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने काश्मीर पर्यटनावर भीतीचे सावट पसरवले असताना, प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी स्वतः पहलगाममध्ये (Pahalgam) जाऊन पर्यटकांना धैर्याचा संदेश दिला आहे. केवळ सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी काश्मीर (Kashmir) सुरक्षित असल्याचा विश्वास व्यक्त केला आणि पर्यटकांना खोऱ्यात येण्याचे आवाहन केले.

प्रत्यक्ष भेटीतून दिला धैर्याचा संदेश

श्रीनगर (Srinagar) पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक पर्यटकांनी आपली काश्मीर यात्रा रद्द केली. या पार्श्वभूमीवर, बॉलिवूड (Bollywood) अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी केवळ सहानुभूती व्यक्त न करता थेट पहलगाम गाठले. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि निसर्गरम्य परिसरातील फोटो समाज माध्यमांवर शेअर केले.

“पर्यटकांवरील हल्ल्याबद्दल केवळ बोलण्यापेक्षा किंवा लिहिण्यापेक्षा मी स्वतः काश्मीरला भेट देण्याचे ठरवले,” असे कुलकर्णी म्हणाले. त्यांचा उद्देश होता की, जे पर्यटक हल्ल्यामुळे घाबरून बुकिंग रद्द करत आहेत, त्यांना आत्मविश्वास देणे आणि काश्मीर खोरे (Kashmir Valley) आजही पर्यटकांसाठी सुरक्षित आहे, हा संदेश जगभरात पोहोचवणे.

दहशतवाद्यांचा मनसुबा उधळण्याचे आवाहन

अतुल कुलकर्णी  यांनी स्पष्ट केले की, “तुम्ही काश्मीरला येऊ नये, यासाठीच दहशतवाद्यांनी हा नरसंहार घडवला आहे. पण काश्मीर आमचा आहे, हा देश आमचा आहे. त्यामुळे आपण इथे यायलाच हवे.” त्यांनी दहशतवादाचा एकत्रितपणे पराभव करण्याचे आवाहन केले.

अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरन (Baisaran) कुरणात झालेल्या हल्ल्यानंतर पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अनेक टूर ऑपरेटर्स आणि हॉटेल व्यावसायिकांनी बुकिंग रद्द होत असल्याचे सांगितले. कुलकर्णी म्हणाले, “मी ऐकले आहे की ९० टक्के बुकिंग रद्द झाले आहेत. कृपया तुमचे बुकिंग रद्द करू नका. तिकीट बुक करा आणि इथे या. आम्ही इथे सुरक्षित आहोत. प्रशासन पूर्ण तयारी करत आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवा.”

Title : Atul Kulkarni Visits Pahalgam, Urges Tourism

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now