‘या’ मंत्र्याच्या मुलावर हल्ल्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

On: December 19, 2024 4:24 PM
Crime news
---Advertisement---

Crime news l राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच आता कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कर भुसे या तरुणाच्या वाहनावर काही टवाळखोरांनी हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मात्र हा हल्ला का केला ya

मंत्री भुसेंच्या मुलाच्या वाहनावर हल्ला :

आज पहाटेच्या सुमारास मालेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. देवदर्शनाहून येताना काही टवाळखोरांनी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कर भुसे या तरुणाच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

मात्र आता या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. तसेच गो तस्करी थांबवण्यासाठी अविष्कार भुसे यांनी प्रयत्न केल्याचे समजत आहे. मात्र त्यानंतरच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच आता या प्रकरणी छावणी पोलिसांनी आयशर देखील जप्त केला आहे. तसेच त्यातून अनेक गाई ताब्यात घेतल्या आहेत.

Crime news l गो-तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला

कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांच्या वाहनावर टवाळखोर व अज्ञात व्यक्तींनी हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. कारण संशयित आरोपी हे गो-तस्कर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच आज पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकारघडला आहे.

यावेळी अविष्कर भुसे देव दर्शनाहून परतत असताना ही घटना घडली आहे. यावेळी आयशर गाडीत जनावर चोरून नेत असल्याचा संशय आल्याने अविष्कार भुसे यांनी वाहनातून त्यांचा पाठलाग केला होता. अगदी त्यानंतरच ही घटना घडली आहे. मात्र याप्रकरणी आरोपींविरोधात मालेगाव छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News Title – attack on Cabinet Minister Dada Bhuse’s son Avishkar Bhuse

महत्त्वाच्या बातम्या-

सासऱ्याने जावयावर केला अ‍ॅसिड हल्ला! कारण ठरलं हनीमूनचं…

… तर मग नव्या मंत्र्यांनी काय करायचं?; शिंदे गटाच्या आमदाराचा संतप्त सवाल

अमित शाहांच्या वक्तव्याने वाद, आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन

“वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये…”; आमदार क्षीरसागर कडाडले

मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची मागणी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now