ATM वापरताना ‘या’ 6 गोष्टी विसरू नका; अन्यथा खातं रिकामं होऊ शकतं!

On: June 23, 2025 6:53 PM
ATM Safety Tips
---Advertisement---

ATM Safety Tips | डिजिटल युगात बहुतांश व्यवहार ऑनलाइन केले जात असले, तरी अनेकदा ATMचा वापर अनिवार्य होतो. मात्र एटीएमद्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे एटीएम वापरताना काही महत्त्वाच्या सुरक्षा उपायांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. रिझर्व्ह बँकेनेही यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

ATM वापरताना लक्षात ठेवा ‘या’ 6 महत्वाच्या गोष्टी:

एटीएम मशीन नीट तपासा : कोणतीही छेडछाड, ढिला कीपॅड, कार्ड स्लॉटमध्ये अडथळा यावर विशेष लक्ष ठेवा. हॅकर्स क्लोनिंगसाठी डिव्हाइस बसवतात.

ATM कार्ड स्वतःच वापरा : कधीही अनोळखी व्यक्तीला किंवा मदतीच्या बहाण्याने कोणालाही कार्ड व पिन देऊ नका. गरज असल्यास फक्त कुटुंबातील व्यक्ती किंवा अधिकृत गार्डची मदत घ्या.

पिन टाकताना सतर्क राहा : पिन नंबर टाकताना दुसऱ्या हाताने कीपॅड झाकून ठेवा. कॅमेऱ्याद्वारे पिन चोरी होण्याची शक्यता असते.

ATM मशीनमध्ये लाईट आहे का ते तपासा : हिरवी/पिवळी लाईट चालू नसेल तर मशीन वापरणे टाळा. ही छेडछाड झाल्याची शक्यता दर्शवते.

स्किमर डिव्हाइसची खात्री करा : कार्ड स्लॉटमध्ये काही अडथळा किंवा बनावट आवरण असल्यास मशीन वापरणे टाळा. हे स्किमर असण्याची शक्यता असते.

पिन वेळोवेळी बदला : जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, 0000 किंवा 1234 असे सोपे पिन वापरणे टाळा. मजबूत व नियमितपणे बदलणारा पिन अधिक सुरक्षित असतो.

ATM Safety Tips | फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवाल? :

– कार्ड वापरल्यानंतर लगेच बँकेच्या अ‍ॅपमधून व्यवहार तपासा

– बँकेकडून येणारे SMS/ईमेल सतत वाचत रहा

– संशयास्पद व्यवहार दिसल्यास त्वरित बँकेशी संपर्क करा

ATM चा सुरक्षित वापर केल्यास तुमचे आर्थिक व्यवहार सुरक्षीत राहतील आणि फसवणुकीपासून वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल.

News Title: ATM Safety Tips: 6 Crucial Things to Avoid Fraud and Protect Your Bank Account

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now