Gopichand Padalakar | सांगलीतील दसरा मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalakar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत राजकीय वातावरण तापले आहे. जयंत पाटील हे ‘राजारामबापूंची औलाद नाहीत’ असे आपण बोललो हे सत्य असून, आपल्या वक्तव्यावरून माघार घेणार नाही, अशी भूमिका पडळकर यांनी घेतली.
सांगलीमध्ये पार पडला दसरा मेळावा :
काल गोपीचंद पडळकर यांचा सांगली मध्ये दसरा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. काही दिवासापुर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जेष्ठ नेते व इस्लामपूरचे (ईश्वरपूर ) आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती. त्यांनी जयंत पाटील यांना ,” तुम्ही राजारामबापूंची औलाद वाटत नाही , असे बोलले होते. त्यांच्या या वक्तव्याचा शरद पवार गटाने सांगलीमध्ये मोर्चा काढून निषेधही केला होता.
या निषेध मोर्चात शरद पवार गटाच्या नेत्यांनी सुद्धा पडळकर यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली. तसेच जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना फोन करून पडळकर यांच्या या वक्त्यव्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
Gopichand Padalakar | जयंत पाटील यांच्यावर पुन्हा टीका :
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना समज दिली होती. पण काल पार पडलेल्या मेळाव्यात त्यांनी पुन्हा जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीका केली. पडळकर यांनी आपल्या वक्तव्याचा गैरअर्थ लावला जात असल्याचे म्हटले. तसेच त्यांना ‘मंगळसूत्र चोर’ संबोधन्यावरूनही जयंत पाटील यांना धारेवर धरले.
पडळकर म्हणाले, “जयंत पाटील तुमच्या कोणत्या बायकोचे मी मंगळसूत्र चोरले आहे. पुढे बोलता, ” जयंत पाटील यांनी आव्हान दिल्यास मी कुठल्याही ठिकाणी जायला तयार आहे”, असे पडळकरांनी स्पष्टपणे सांगितले. मात्र आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून, भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.






