कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये जसप्रीत बुमराहसाठी ख्रिस मार्टिनने केलं असं काही की…व्हिडीओ तुफान व्हायरल

On: January 27, 2025 11:54 AM
at Coldplay Concert Chris Martin Sings Special Song for Jasprit Bumrah  
---Advertisement---

Coldplay Concert | प्रसिद्ध म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर (Music of the Spheres World Tour) असलेला कोल्डप्ले बँड (Coldplay Band) सध्या भारतात (India) आहे. काही दिवसांपूर्वी डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) कोल्डप्ले कॉन्सर्ट (Coldplay Concert) पार पडला होता. यानंतर अहमदाबादमध्ये (Ahmedabad) देखील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) कोल्डप्ले कॉन्सर्ट पार पडला. यावेळी कोल्डप्ले कॉन्सर्टला टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू (Team India Star Cricketer) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने हजेरी लावली होती. ख्रिस मार्टिन (Chris Martin) याने जसप्रीत बुमराहसाठी गाणे गायल्यानंतर काय झाले? याचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जसप्रीत बुमराहसह पार्थिव पटेल (Parthiv Patel), प्रफुल्ल दवे (Praful Dave), इशानी दवे (Ishani Dave), जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांनी देखील कार्यक्रमात हजेरी लावली होती.

कोल्डप्ले बँडचा लीड सिंगर ख्रिस मार्टिन हा जसप्रीत बुमराहचा मोठा चाहता आहे. त्याने बुमराहला या कॉन्सर्टसाठी खास निमंत्रण दिले होते.

ख्रिस मार्टिनने गायले जसप्रीतसाठी खास गाणे

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी मैदानातील (Narendra Modi Stadium) कोल्डप्लेच्या कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने देखील उपस्थिती लावली होती. ख्रिस मार्टिन जसप्रीत बुमराह याचा मोठा चाहता आहे, त्यामुळे त्याने बुमराहला खास निमंत्रण दिले होते. बुमराहला पाहताच ख्रिस मार्टिन याने त्याच्यासाठी खास गाणे देखील गायले. तसेच बुमराहने घेतलेल्या विकेट्सचे व्हिडिओ (Videos) देखील कॉन्सर्टमध्ये दाखवण्यात आले.

कॉन्सर्टमध्ये बुमराहच्या उपस्थितीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ख्रिस मार्टिनने बुमराहसाठी खास गाणे गात त्याचे कौतुक केले.

‘तुझ्या विकेट्स पाहून वाईट वाटतं…’

जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध (England) घेतलेल्या विकेट्स देखील स्क्रीनवर दाखवल्यानंतर ख्रिस मार्टिन याने जसप्रीतचे कौतुक केले. “माय डियर ब्रदर जसप्रीत बुमराह, जागतिक क्रिकेटमधील (World Cricket) सर्वोत्तम गोलंदाज (Best Bowler) आहेस, पण तू इंग्लंडविरुद्ध विकेट्स घेतो, तेव्हा मला खूप वाईट वाटतं,” असे ख्रिस मार्टिन गाण्याच्या माध्यमातून म्हणाला. बुमराहने जेव्हा स्वतःला पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तेज दिसून येत होते.

ख्रिस मार्टिनच्या या गोड कौतुकाने बुमराह नक्कीच भारावून गेला असणार. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर

दरम्यान, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) जसप्रीत बुमराह याला दुखापत झाली होती. त्यानंतर आता तो इंग्लंडविरुद्धच्या सिरीजमधून बाहेर आहे. तसेच बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) खेळणार की नाही? यावर देखील प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. बुमराहने केलेल्या अफलातून कामगिरीमुळे सध्या तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. (Coldplay Concert)

बुमराहच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. तो लवकरच तंदुरुस्त होऊन संघात पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

Title: at Coldplay Concert Chris Martin Sings Special Song for Jasprit Bumrah  

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now