Sankashti Chaturthi | आजचा दिवस वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानला जातो. कारण आज संकष्ट चतुर्थी असून, त्याच दिवशी वृद्धी योग व नवम पंचम योगाचा संयोग झाला आहे. गणेश उपासनेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. चंद्राचा प्रवेश मेष राशीत झाल्यामुळे आजच्या दिवशी पाच राशींवर विशेष कृपा होणार आहे. या राशींना अचानक धनलाभ, प्रगतीचे संकेत आणि कार्यसिद्धीचे लाभ मिळणार आहेत.
वृषभ रास (Taurus) :
आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. नोकरी बदलाची किंवा व्यवसायात नवे प्रयोग करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळेल. बाप्पाच्या कृपेने तुमच्या मनातील काही मोठ्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Sankashti Chaturthi | मिथुन रास (Gemini) :
मिथुन राशीसाठी आजचा दिवस भाग्यवान ठरेल. आर्थिक नियोजनासाठी हा दिवस योग्य आहे. प्रवासाची योजना असेल तर त्यासाठी वेळ उत्तम आहे.
संध्याकाळी गणपती मंदिरात दर्शन घेतल्यास आयुष्यातील अडथळे दूर होतील. कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील.
सिंह रास (Leo) :
सिंह राशीच्या लोकांना आज आत्मविश्वासाची प्रचंड उर्जा जाणवेल. नशिबाची साथ लाभेल व कार्यक्षेत्रातील अडथळे दूर होतील. प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर यश निश्चित मिळेल. कौटुंबिक जीवनात जोडीदाराची साथ महत्त्वाची ठरेल.
तूळ रास (Libra) :
तूळ राशीसाठी आज धनवृद्धीचा दिवस आहे. अचानक मिळालेल्या धनलाभामुळे आनंद मिळेल. मित्रांकडून नवीन कार्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आर्थिक संपत्तीत भरभराट होण्याची शक्यता आहे. बाप्पाच्या कृपेने तुमची प्रगती निश्चित आहे. (Sankashti Chaturthi)
मकर रास (Capricorn) :
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुख समाधानाचा ठरेल. नवी संधी हाताशी येईल, तिचा योग्य फायदा घ्या. धार्मिक कार्यात सहभाग घेतल्यास मनाला शांती लाभेल.
प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे अपेक्षित फळ मिळेल. इच्छा पूर्ण होण्यासाठी आजचा दिवस विशेष ठरणार आहे.






