आज कर्कसह ‘या’ 5 राशींचे येणार सोन्याचे दिवस, उत्पन्न होणार डबल!

On: September 30, 2024 10:33 AM
Astrology Panchang today
---Advertisement---

Astrology Panchang | आज 30 सप्टेंबर, सोमवारी चंद्र सिंह राशीत राहणार आहे आणि गुरू चंद्रापासून दहाव्या भावात असल्यामुळे आज अमला योग तयार होत आहे. आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. आजच्या दिवशी सोम प्रदोष व्रत आणि त्रयोदशी तिथीचं श्राद्धही केलं जाईल. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 5 राशींना या शुभ संयोगाचा खूप फायदा होणार आहे. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात. (Astrology Panchang )

‘या’ 5 राशीचे येणार सोन्याचे दिवस

वृषभ रास : सोम प्रदोष व्रताचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. आज भगवान शकंराच्या कृपेने या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हं आहेत. आज तुम्हाला व्यवसायात भरभरून यश मिळणार आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे, नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. आज नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. (Astrology Panchang )

कर्क रास : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज भोलेनाथांच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांच्या दीर्घकाळ दडपलेल्या इच्छा पूर्ण होतील. नोकरी करणारे लोक आज दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात. आज सोनं खरेदी करण्याचा विचार कराल. तुमची आर्थिक प्रगती होईल.

कन्या रास : कन्या राशीचे लोक आज एखाद्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. आज तुमचे सरकारी योजनेचे पैसे येतील. यामुळे आनंदी राहाल. आज तुम्ही व्यवसायात एखादी योजना सुरू करू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन चांगलं राहील. (Astrology Panchang )

वृश्चिक रास : कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित काही वाद चालू असतील तर ते आज कुटुंबातील सदस्याच्या मदतीने सोडवले जाऊ शकतात. आज दान-धर्म कराल. विवाह योग जुळून येईल. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे विवाहस्थळ चालून येईल.

मकर रास : व्यवसायात कठोर परिश्रम केल्यानंतर तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांनाही आज चांगली बातमी मिळू शकते. नशिबाच्या पाठिंब्याने आज तुमची सर्व कामं सुरळीत आणि वेळेवर पूर्ण होतील. (Astrology Panchang )

News Title :  Astrology Panchang today 

महत्वाच्या बातम्या –

..आता याला काय म्हणावं?, मुंबईत शाळकरी मुलीने रचला स्वतःच्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव

राज्यात पुढील 5 दिवस पावसाचे, पाहा कुठे-कुठे बरसणार पाऊस?

“गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहीणींना फक्त 1500 रुपये?”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आनंद दिघेंप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घात करण्याचा डाव होता?, कुणी केला दावा?

आज सोमवारी, महादेव कोणत्या राशीवर कृपादृष्टी ठेवणार?, वाचा राशीभविष्य

Join WhatsApp Group

Join Now