आज जुळून आला गुरु पुष्य योग; ‘या’ 5 राशींचं भाग्य उजळणार!

On: September 26, 2024 9:19 AM
Astrology Panchang 26 september
---Advertisement---

Astrology Panchang | आज 26 सप्टेंबर 2024 रोजी गुरु पुष्य योग जुळून आला आहे. आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. आजच्या दिवशी गुरु पुष्य योगासह अमृत सिद्धी योग आणि पुनर्वसु नक्षत्र योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे.आजच्या या शुभ दिनी काही राशीला मोठा फायदा होणार आहे. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात. (Astrology Panchang)

‘या’ 5 राशींचं भाग्य उजळणार

मिथुन रास : या राशीसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने तुमची सर्व कार्य चांगली होतील. आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. आज तुम्ही मिळालेल्या संधीचे सोने कराल. आज कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. (Astrology Panchang)

कन्या रास : आज तुम्हाला नशीबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. नवीन सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. तरुणांना आज दिवसभरात गोड बातमी ऐकायला मिळेल. रखडलेली कार्य मार्गी लागतील.

तूळ रास : भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या विवाह स्थळ जुळून येण्यामधील सर्व अडचणी आज दूर होतील. तुम्हाला मनाप्रमाणे लाईफ पार्टनर मिळेल. महिला वर्गाला आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. (Astrology Panchang)

मकर रास : आज तुम्ही व्यवसायात नवीन योजना आखाल. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. आज तुम्हाला अनावश्यक खर्चापासून मुक्ती मिळेल आणि पैसे कमवण्याचे नवीन मार्गही सापडतील. आज तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मोठा नफा होईल. आरोग्याच्या समस्या देखील दूर होतील.

मीन रास : सूर्यदेवाच्या कृपेने व्यावसायिकांना आज नफा होईल. तुम्ही दिवसभर उत्साही असाल आणि अनेक अपूर्ण घरगुती कामं पूर्ण कराल. आज तुमचे खूप दिवसांपासून अडकलेले पैसे देखील परत मिळतील. आज तुमचं आरोग्य चांगलं असेल. (Astrology Panchang)

News Title : Astrology Panchang 26 september 

महत्वाच्या बातम्या –

मुंबई पुन्हा तुंबली! मुसळधार पावसाने लोकल सेवा मंदावली, जनजीवनही विस्कळीत

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर

आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार?, वाचा राशी भविष्य

तर पाडापाडी झाल्यास…; जरांगे पाटलांनी सरकारला दिला थेट इशारा

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयची हत्या!; ‘या’ खुलाशाने सगळीकडे खळबळ

Join WhatsApp Group

Join Now