Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने काल रात्री आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात 65 उमेदवारांची नावे आहेत. उद्धव ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेविरोधात पहिल्या यादीतील 33 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी 45 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काल उद्धव ठाकरेंनी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. (Assembly Election 2024 )
यामध्ये मुंबईत 13 मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. तर, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तसेच, झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिंदेंच्या पहिल्या यादीतील सर्वच 33 उमेदवारांविरुद्ध ठाकरेंनी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या 33 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी. pic.twitter.com/QAJ01ce7ds
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2024
‘या’ मतदारसंघात होणार ठाकरे विरुद्ध शिंदे सामना
१) कोपरीपाचपखाडी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे
२)ओवळा मजिवाडा
प्रताप सरनाईक विरूद्ध नरेश मणेरा
३)मागाठणे
प्रकाश सुर्वे विरुद्ध उदेश पाटेकर
४)जोगेश्वरी पूर्व
मनीषा वायकर विरुद्ध अनंत ( बाळा) नर
५) चांदिवली
दिलीप मामा लांडे विरुद्ध अद्याप दिला नाही.
६) कुर्ला
मंगेश कुडाळकर विरूध्द प्रवीणा मोरजकर
७)माहिम
सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत
८)भायखळा
यामिनी जाधव विरुद्ध अद्याप दिला नाही
९)अलिबाग
महेंद्र दळवी विरुद्ध अद्याप दिला नाही
१०)महाड
भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप
११)खानापुर
सुहास बाबर विरुद्ध अद्याप दिला नाही
१२)पाचोरा
किशोर धनसिंग पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी
१३)राधानगरी
प्रकाश आबिटकर विरुध के पी पाटील (Assembly Election 2024 )
१४)राजापूर
किरण सामंत विरुद्ध राजन साळवी
१५)सावंतवाडी
दिपक केसरकर विरुद्ध राजन तेली.
१६)कुडाळ
निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक
१७)रत्नागिरी
उदय सामंत विरुद्ध सुरेंद्र नाथ माने
१८)दापोली
योगेश कदम विरूद्ध संजय कदम
१९)पाटण
देसाई विरुद्ध हर्षद कदम (Assembly Election 2024 )
२०)सांगोला
शहाजी बापू पाटील विरुद्ध साळुंखे
२१)परांडा
सावंत विरुद्ध राहुल पाटील.
२२)कर्जत
महेंद्र थोरवे विरुद्ध नितिन सावंत
२३)मालेगाव बाह्य
दादा भुसे विरुद्ध अद्वेय हिरे
२४)नांदगाव
सुहास कांदे विरुद्ध गणेश धात्रक
२५)वैजापूर
रमेश बोरणारे विरूद्ध दिनेश परदेशी
२६)पैठण
विलास भुमरे विरुद्ध अद्याप दिला नाही
२७)संभाजीनगर पश्चिम
संजय शिरसाठ विरुद्ध राजू शिंदे
२८)संभाजीनगर मध्य
प्रदीप जयस्वाल विरुद्ध किशनचंद तनवाणी
२९)सिल्लोड
अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकर
३०)कळमनुरी
संतोष बांगर विरुद्ध संतोष टारफे
३१)भंडारा
नरेंद्र भोंडेकर विरुद्ध अद्याप दिला नाही.
३२)रामटेक
आशिष जयस्वाल विरुद्ध विशाल बरबटे
३३)मेहकर
डॉ संजय रायमुलकर विरुद्ध सिद्धार्थ खरात
News Title : Assembly Election 2024 thackeray vs shinde
महत्वाच्या बातम्या –
आज गुरुपुष्यामृत योग ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्याचा, मिळणार भरपूर यश!
महायुतीत दोस्तीत-कुस्ती?; भाजप नेत्याने शिवसेनेचं टेंशन वाढवलं
रवी राणा लोकसभा निवडणुकीचा बदला विधानसभेला घेणार?
उद्धव ठाकरेंनी ‘या’ दिग्गज नेत्यांना दिले एबी फॉर्म!
शर्मिला ठाकरेंनी ओवाळणीत मागितली चक्क ‘आमदारकी’; नेमकं काय घडलं






