Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. अशात कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे करवीर विधानसभा मतदारसंघातील (karvir assembly constituency) जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे (Santaji Ghorpade) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Assembly Election 2024)
मिळालेल्या माहितीनुसार, संताजी घोरपडे रविवारी रात्री प्रचार संपवून आपल्या सहकाऱ्यांसह कोल्हापूरकडे परतत असताना मनवाड येथे काही व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली.जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं समजत ते आपल्याला भेटण्यासाठी थांबले असतील, असं संताजी घोरपडे यांना वाटलं.
संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला
त्यामुळे संताजी घोरपडे गाडीतून खाली उतरत त्यांच्याशी विचारपुस करण्यासाठी पुढे गेले. त्यावेळी बाहेरील लोकांनी काठ्या आणि भाल्यासह संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला चढवला. घोरपडे यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला. 6 अनोळख्या व्यक्तींनी हा हल्ला केल्याची माहिती आहे.
या हल्ल्यात संताजी घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्याला आणि हाताला जबर मार लागला, यामुळे रक्तस्त्राव देखील झाला. अचानक करण्यात आलेला हा हल्ला घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कसाबसा परतावून लावला. या हल्ल्यानंतर मारेकरी रस्त्यालगत असणाऱ्या शेतात पळून गेले. जाताना त्यांनी संताजी घोरपडे यांच्या गाडीवरही दगडफेक केली. (Assembly Election 2024)
कोल्हापुर राजकारणात खळबळ
यानंतर संताजी घोरपडे आणि त्यांचे सहकारी कोल्हापूरमध्ये परतले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. त्यामुळे त्यांच्यावर झालेला हल्ला हा राजकीय हेतूने तर नाही झाला?, असा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणामुळे कोल्हापुरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. (Assembly Election 2024)
News Title : Assembly Election 2024 Attack on Santaji Ghorpade
महत्वाच्या बातम्या –
आज संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशींच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होणार!
मतदानाच्या दोन दिवसआधी भाजपचा मोठा डाव, ठाकरे गटाला धक्का
“मला सिगरेटचे चटके…”, बाॅलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने सलमानवर केले गंभीर आरोप
प्रतिभा पवारांना अडवलं, सोशल मीडियावर अजित पवारांविरोधात संताप
“हनीमूनच्या रात्री, माझ्या शरीराचा…”, करिश्मा कपूरच्या गौप्यस्फोटाने बाॅलिवूड हादरलं!






