AB फॉर्म म्हणजे नेमकं असतं तरी काय?, निवडणुकीत याला इतकं महत्व का?

On: October 24, 2024 10:18 AM
Municipal Elections Reservation
---Advertisement---

Assembly Election 2024 | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला देखील सुरुवात झाली आहे. आतापर्यंत महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर, महाविकास आघाडीकडून देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटाने कालच पहिली यादी घोषित केली. (Assembly Election 2024)

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातील काही नेत्यांना AB फॉर्म दिले आहेत. निवडणुकीत या AB फॉर्मला फार महत्व असते. मात्र, हा AB फॉर्म म्हणजे नेमका असतो तरी काय?, निवडणुकीत त्याचे काय महत्व असते आणि तो बाद झाला तर काय परिणाम होतो, याबाबत या लेखात सविस्तर जाणून घेऊयात.

AB फॉर्म म्हणजे काय?

देशात लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवायची असेल तर, उमेदवाराला त्याची खासगी माहिती आणि तो कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. यासाठी दोन फॉर्म भरावे लागतात.यातील पहिला फॉर्म हा A आणि दुसऱ्या फॉर्मला B असे म्हणतात. यालाच एकत्रित AB फॉर्म म्हटले जाते. (Assembly Election 2024)

पक्षाचे अधिकृत चिन्ह उमेदवारीमागे लागण्यासाठी उमेदवार AB फॉर्म भरतात. या फॉर्मवर पक्षाने तिकिट वाटपासाठी अधिकृत नेमणूक केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.एबी फॉर्म भरणे म्हणजे तो उमेदवार पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचे समजले जाते. त्यामुळे हे दोन्ही फॉर्म अत्यंत महत्वाचे असतात. या फॉर्ममध्ये काही प्रतिज्ञापत्रकंही असतात.

फॉर्म A मध्ये काय असते?

मान्यताप्राप्त व नोंदणीकृत राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे नाव सांगणारा हा फॉर्म असतो. यामध्ये पक्षाचा अधिकृत शिक्का आणि तिकिटवाटपासाठी पक्षाने नेमलेल्या प्रमुख व्यक्तीची सही असते. तसेच, उमेदवाराचे नाव, पक्षातील पद, पक्षाचे चिन्ह हे सर्व नमूद असते. (Assembly Election 2024)

फॉर्म B मध्ये काय असते?

या फॉर्ममध्ये उमेदवाराची संपूर्ण माहिती असते. बी फॉर्मवर पक्षाने सुचवलेल्या आणखी एका उमेदवाराचेही नाव असते. जर, काही कारणांमुळे पहिल्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर ‘बॅकअप’ म्हणून या दुसऱ्या उमेदवाराला निवडणूक आयोग अधिकृत उमेदवार म्हणून निवडू शकतो. (Assembly Election 2024)

News Title :  Assembly Election 2024 AB form Details

महत्वाच्या बातम्या –

‘या’ मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना; पाहा कुणाचं पारडं भारी?

आज गुरुपुष्यामृत योग ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्याचा, मिळणार भरपूर यश!

महायुतीत दोस्तीत-कुस्ती?; भाजप नेत्याने शिवसेनेचं टेंशन वाढवलं

रवी राणा लोकसभा निवडणुकीचा बदला विधानसभेला घेणार?

उद्धव ठाकरेंनी ‘या’ दिग्गज नेत्यांना दिले एबी फॉर्म!

Join WhatsApp Group

Join Now