Asia cup 2025 | 9 सप्टेंबरला सुरु झालेल्या आशिया चषक 2025 मध्ये रोमांचक समीकरण बनले आहे. आतापर्यंत एकूण 19 सामने या स्पर्धेत झाले आहेत आणि रोज खेळ नवीन वळण घेत आहे. सगळे सामने यूएईला घेतले जात आहेत.
सध्या सुपर 4 सामने चालू आहेत. भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान हे चार देश सुपर 4 पर्यंत पोहोचले आहेत आणि सुपर 4 च्या तिसऱ्या फेरीत पाकिस्तानने 5 विकेटनी श्रीलंकेला हरवले आणि या विजयानंतर अंतिम फेरीसाठी पाकिस्तानची आशा कायम आहे. भारत तर सुपर 4च्या पहिल्या सामान्यापासूनच वर्चस्व गाजवत आहे. दोघेही देश अंतिम फेरीसाठी मजबूत पाऊल टाकत आहेत.
पाकिस्तानची आशा कायम :
सुपर -4 च्या तिसऱ्या फेरीत अबू धाबीच्या मैदानावर श्रीलंकेने टॉस जिंकलं होता. प्रथम फलंदाजी करून 20 षटकात मध्ये 133 धावांचा आकडा पाकिस्तानला श्रीलंकेनी दिला होता.
परंतु 18 षटकातच पाकिस्तानने हे लक्ष्य गाठले आणि यासोबत त्याची अंतिम फेरीत जाण्याची शक्यता वाढली आहे. श्रीलंकेला मात्र आता बाकीच्या सामान्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
भारत ठरला अपराजित! :
2025 च्या या आशिया चषकात भारत अग्रेसर आहे. भारतर अजून एकही सामना हरलेला नाही. या सामन्यासह super-4 मध्ये देखील भारताने पाकिस्तानाला 6 विकेट्सनी पराभूत केले. भारताकडे अंतिम फेरीत जाण्यासाठी आजून 2 सामने आहेत. आज बांगलादेश सोबत भारताचा सामना रंगणार असून तो जिंकल्यास भारत अंतिम फेरीत जाईल. सध्या भारत सुपर 4 च्या टेबल मध्ये 2 गुण आणि 0.689 च्या रन रेट वर आहे.
सुपर 4 मध्ये बांगलादेश नी +0.121 च्या रन रेट सह 2 गुण मिळवले आहेत आणि आता त्याच्यासमोर भारत आणि पाकिस्तानचे आवाहन आहे. या दोन सामान्यापैकी एक सामना जिंकणे त्याच्यासाठी आवश्यक ठरणार आहे.
पाकिस्तान एक विजय दूर :
भारताने पाकिस्तानात पहिल्या सामन्यात हरवले तरी श्रीलंकेसोबतच्या सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानने आशा निर्माण केली आहे. त्याचा पुढचा सामना बांगलादेश सोबत आहे. हे दोन्ही देश 2 गुणांसह आमनेसामने येणार आहेत. आज होणाऱ्या भारत-बांगलादेश सामान्यात जर तो जिंकला तर पाकिस्तानच्या आशा ढसाळण्याची शक्यता आहे.
या रोमांचक समीकरांमुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान सामान्यांसाठी समोरासमोर येणार की काय अश्या चर्चा रंगत आहेत. या चषकात झालेल्या दोन सामान्यांमध्ये भारताने पाकिस्तानला हरवून प्रथम स्थान पटकावले आहे. पुन्हा एकदा या दोन्ही देशांच्या सामान्यांसाठी चहात्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.






