‘या’ कारणास्तव आसाराम बापूला जामीन मंजूर!

On: January 7, 2025 2:37 PM
Asaram bapu bail
---Advertisement---

Asaram bapu bail l अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आसाराम बापूला आज न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. 2013 मधील एका बलात्कार प्रकरणात गांधीनगर येथील स्थानिक न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अगदी तेव्हापासून आसाराम बापू तुरूंगात आहेत. मात्र आता वैद्यकीय कारणात्सव आसाराम बापूला 31 मार्चपर्यंत न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अटी आणि शर्ती लावल्या :

आसाराम बापूला जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी आणि शर्ती देखील लावल्या आहेत. यामधील सर्वात मोठी अट म्हणजे या कालावधीत आसाराम बापू शिष्य, अनुयायी यांना भेटू शकणार नाहीत. मात्र न्यायालयाने आसाराम बापूला मेडिकल ग्राऊंडवर जामीन मंजूर केला आहे.

याशिवाय बलात्कार प्रकरणातील पुरावे मिटवण्याचा अथवा त्यांच्याशी छेडछाड न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना आसाराम बापू यांना दिले आहेत. तसेच या कालावधीत ते शिष्य, अनुयायी यांना देखील भेटू शकणार नाहीत.

Asaram bapu bail l आसाराम बापूला सशर्त जामीन मंजूर :

सध्या आसाराम बापूवर तुरूंगातील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.तसेच त्यांना यापूर्वी देखील हृद्य विकाराचा झटका आला होता. मात्र त्यामुळे आता न्यायालयाने मेडिकल ग्राऊंडवर आसाराम बापूला जामीन मंजूर केला आहे.

याशिवाय आसाराम बापूकडून जामीन मिळावा यासाठी अनेकदा जामीन अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र यावेळी त्यांनी अर्ज दाखल केला असता केवळ वैद्यकीय कारणाबाबतच विचार करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. मात्र याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच कारणांचा विचार केल्या जाणार नाही असे मत सर्वोच्च न्यायालयाने देखील नोंदवले होते. मात्र आज कोर्टाने आसाराम बापूला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

News Title : Asaram gets bail from Supreme Court

महत्वाच्या बातम्या –

मुंडे भाऊ-बहिणीविरोधात मराठा समाज आक्रमक, दोघांच्याही राजीनाम्याची केली मागणी

HMPV व्हायरसमुळे मृत्यू ओढावू शकतो का?; मोठी माहिती समोर

वाल्मिक कराडकडे कोट्यवधींची संपत्ती, आकडा पाहून अधिकारीही थक्क

पंकजा मुंडेंना कोणी पाडलं? सुरेश धस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

राज्यात पुन्हा होम क्वारंटाईन, आयसोलेशन वॉर्ड?; धक्कादायक बातमी समोर

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now