Aryan Khan | बॉलीवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खान याचा चाहतावर्ग संपूर्ण जगभरात पाहायला मिळतो. अशात शाहरुखचा लाडका लेक आर्यन खान चर्चेत आला आहे. आर्यन खानने बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला थेट प्रायव्हेट व्हिडिओ लिक करण्याची धमकी दिली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक खुलासा अभिनेत्रीने स्वतः केला आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून अनन्या पांडे आहे. (Aryan Khan)
एका मुलाखतीमध्ये अनन्या पांडेने हा मोठा खुलासा केला आहे.अभिनेता चंकी पांडेची लेक अनन्या पांडे आणि आर्यन खान हे दोघेही बालपणीचे चांगले मित्र आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा आहे जेव्हा आर्यन याने अनन्या हिला खासगी व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली होती. अनेक वर्षानंतर अनन्या हिने हा किस्सा सांगितला आहे.
नेमकं काय म्हणाली अनन्या पांडे?
“मी अगोदर दिवसभरातील सर्व काही व्हिडिओ रेकॉर्ड करायची. मी दिवसभरात काय खातेय, काय करतेय.. असं सर्वकाही मी रेकॉर्ड करायची. पण मी कधीच ते व्हिडिओ पोस्ट केले नाही. आजही माझ्याकडे ते व्हिडिओ आहेत.ॲप्पलमध्ये फोटोबूथ तेव्हा नवीन आलं होतं. मी, सुहाना खान, शनाया कपूर आम्ही कायम गोष्टी रेकॉर्ड करायचो… तेव्हा आर्यन आम्हाला धमकी द्यायचा”, असं मुलाखतीमध्ये अनन्या म्हणाली. (Aryan Khan)
तसंच पुढे तिने सांगितलं की, “आर्यन कायम म्हणायचा माझी कामं केली नाहीत तर तुमचे व्हिडीओ लीक करेल… सर्वकाही लहानपणीच्या आठवणी आहेत.”, असं अनन्या म्हणाली. तसंच आर्यनचं बोलणं म्हणजे फक्त लहानपणीचा विनोद होता, बाकी काही नाही. मात्र, ऑनलाईन सेफ्टी असणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं अनन्यानं सांगितलं.
अनन्या पांडेचा व्हिडिओ तूफान व्हायरल
आर्यन खान हा शाहरुख खानचा मुलगा तसेच सुहाना खानचा भाऊ आहे. संजय कपूरची मुलगी शनाया कपूर, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अनन्या पांडे या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. यांच्यासोबत आर्यन खान अनेकदा आउटिंग करताना दिसला आहे. अशात अनन्याने हा बालपणीचा किस्सा सांगितला आहे. (Aryan Khan)
दरम्यान, अनन्या पांडेचा एक व्हिडीओ नेटफ्लिक्सनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनन्या आणि CTRL चे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी, कॉमेडियन तन्मय भट्ट यांच्यासोबत चित्रपटाबाबत बोलताना दिसली. याचवेळी बोलताना अनन्या पांडेने हा खुलासा केला होता. हा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.
News Title : aryan khan threatened ananya pandey
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीचा अजून एक नेता बिश्नोई गँगच्या टार्गेटवर?, धक्कादायक माहिती समोर
बाबा सिद्दिकी हत्येनंतर भाजप नेत्याचा सलमान खानला मोठा सल्ला; थेट म्हणाले..
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन?, आणखी एका आरोपीला अटक
आज सोमवार, महादेवाची ‘या’ राशींवर असणार कृपादृष्टी!
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या शुटरबाबत धक्कादायक माहिती समोर!






