Andekar Gang | गुन्हेगारीला उत्तेजन देणाऱ्या आंदेकर टोळीचे (Andekar Gang) आणि त्यांच्या नंबर कारचे सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्यांवर पुण्यातील (Pune) समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मंथन भालेराव (रा. मंजुळाबाई चाळ, नानापेठ, पुणे), ओम नगरकर, हर्षल पवार, पियूष बिडकर, अथर्व नलावडे, ओमकार मेरगु, फेजल शेख (सर्व रा. नानापेठ) यांचा समावेश आहे.
आयुष कोमकर यांच्या चुलत बहिणीने दिली तक्रार
याप्रकरणी तक्रार आयुष कोमकर यांच्या चुलत बहिणीने दिली आहे. काही महिन्यांपूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanaraj Andekar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या कोमकर टोळीने घडवून आणली होती. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी भर गणेश उत्सवात आंदेकर टोळीतील आरोपींनी आयुष कोमकर (Ayush Komkar) याची गोळ्या झाडून हत्या केली होती.
या प्रकरणात बंडू आंदेकरसह (Bandu Andekar) त्याच्या टोळीवर कारवाई करून त्यांना अटक झाली. पुढे या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच इतर संबंधित घटकांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.
Andekar Gang | पोलिसांनी केली कारवाई :
तक्रारदारानुसार, 1 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांनी सोशल मीडियावर पाहिले की, त्यांच्या परिसरातील मंथन भालेराव यांनी “बदला तो होगा, आता फक्त बॉड्या मोजा… शेर था मेरा बॉस… वन अँड ओलनी कंपनी” अशा आशयाचे स्टेटस पोस्ट केले होते आणि त्यात पिस्तुलाचे चिन्हही वापरले होते.
या स्टेट्समुळे गुन्हेगारीला उत्तेजन मिळाले म्हणून पोलिसांनी त्वरित कारवाई केली.






