Arjun Kapoor | अभिनेता अर्जून कपूर आणि मलायका आरोरा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सर्व काही ठिक नसल्याचं बोललं जात आहे. मलायकाने आपल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अर्जून कपूरला डेट करायला सुरुवात केली. अनेक कार्यक्रमात दोघे एकत्रीत दिसतात. सोशल मीडियावर दोघांची जबरदस्त फॅन फाॅलोईंग पहायला मिळते. गेल्या काही दिवसात अर्जून आणि मलायकाचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान एका पार्टीत स्वतः अर्जून कपूरने मलायका सोबत असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.
काय म्हणाला अर्जून?
एका कार्यक्रमात बोलत असताना अर्जूनने (Arjun Kapoor) मलायका सोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. बोलत असताना, अर्जूनने मायक्रोफोन हातात घेतला. त्यानंतर चाहत्यांनी मलायकाच्या नावाची घोषणा सुरु केली. दरम्यान, यावर अर्जूनने प्रतिक्रिया दिली. अर्जून म्हणाला की, “आता मी सिंगल आहे, मी रिलॅक्स आहे. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन पहिल्यांदाच त्याच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी इतक्या खुलेपणाने व्यक्त झाला.
View this post on Instagram
अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर 2018 पासून मलायका अर्जुनला डेट करू लागली. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिलं गेलं. वयातील अंतरावरून दोघांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. मात्र या ट्रोलिंगलाही न जुमानता त्यांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला.
अर्जून मलायकाच्या नात्याला पूर्णविराम?
मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर अर्जून (Arjun Kapoor) कपूर तेव्हा तिला तिच्या कठीण काळातसोबत असल्याचं पहायला मिळालं. वडिल गेल्यानंतर अर्जून कपूरने मलायकाचं सांत्वण केलं होतं. त्यावेळी मलायकासोबत पुन्हा पाहून नेटकऱ्यांनी दोघांच्या पॅचअपची शक्यता वर्तवली होती. मात्र आता अर्जूनने मी सिंगल असल्याचं म्हटलं आहे.
News Title : arjun kapoor gives statement about his relationship
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवारांनी भरसभेत केली अजित पवारांच्या रडण्याची नक्कल!
निवडणुकीच्या तोंडावर आमदार गायब झाल्याने राज्यात खळबळ!
मोठी बातमी! पुण्यात महायुतीमध्ये बिघाडीला सुरवात
माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला, अजित पवारांकडून बडा उमेदवार मैदानात
लक्ष्मी पावली! धनत्रयोदशीला सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचे भाव






