अरबाज पटेल पुन्हा बिग बॉसमध्ये झळकणार?

On: September 25, 2024 2:48 PM
Arbaz Patel
---Advertisement---

Arbaz Patel l बिग बॉस मराठी सीझन 5 ने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. कारण या सीझनने यापूर्वीचे सर्व TRP रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. अशातच गेल्या आठवड्यात अरबाज पटेल (Arbaz Patel) ची घरातून एग्झिट झाला आहे. मात्र बिग बॉस मराठी पाचच्या सीझनच्या सुरुवातीपासूनच अरबाज पटेल हा ट्रॉफीचा दावेदार म्हणून ओळखला जात होता. मात्र आता अरबाज पटेल बिग बॉस मराठीच्या बाहेर पडल्यानंतर तो बिग बॉस हिंदीच्या अठराव्या सिझनमध्ये सहभागी होऊ शकतो अशा चर्चाना उधाण आलं आहे.

अरबाज बिग बॉस हिंदीमध्ये झळकणार :

अरबाज पटेल हा एलिमिनेट झाल्यामुळे घरातली त्याची घट्ट मैत्रिण निक्की हतबल झाली आहे. कारण अरबाजच्या जाण्यानं निक्कीला मोठा मानसिक धक्का बसल्याचं देखील घरातील सदस्यांकडूनच वारंवार बोललं जात आहे. अशातच आता अरबाज पटेल मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आगामी हिंदी बिग बॉस हिंदीच्या अठराव्या सीझनमध्ये खेळताना दिसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर अरबाज पटेलने देखील माध्यमांसोबत संवाद साधला आहे. त्यावेळी देखील अरबाजनं केलेल्या वक्तव्यामुळे अरबाज खरंच बिग बॉस हिंदीमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Arbaz Patel l मी नक्की कुठे ना कुठे दिसणारच : अरबाज पटेल

अरबाज पटेल बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर हिंदी बिग बॉस 18 मध्ये जाणार का? असा प्रश्न अरबाजला विचारण्यात आला आहे. यावेळी तो म्हणाला की “बघुया पुढे… महाराष्ट्राला बघायचं असेल तर… पुढे अजून भरपूर प्रोजेक्ट आहेत. तुम्हाला तर मी नक्की कुठे ना कुठे दिसणारच आहे.” त्यामुळे आता खरंच तो हिंदी बिग बॉस 18 मध्ये दिसणार का? किंवा तो वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेणार का? अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.

अरबाज पटेल तब्बल 57 दिवस बिग बॉस मराठी सीझन 5 च्या घरात होता. अरबाज म्हणजे, निक्की आणि निक्की म्हणजेच अरबाज, हे समीकरण या सीझनमध्ये अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. तसेच या सीझनमध्ये अरबाजच्या गेमचं देखील कौतुक प्रेक्षकांनी केलं आहे, तर काहींनी त्याच्यावर टीका केली आहे. पण, मात्र आता अरबाजचा बिग बॉस मराठीचा प्रवास संपला असला तरी आता तो लवकरच अरबाज बिग बॉस हिंदीच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

News Title : Arbaz Patel to participate in big boss hindi 18

महत्वाच्या बातम्या-

अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मोठा प्रश्न उपस्थित

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

गायिका नेहा कक्करचं लग्न मोडणार?, रोहनप्रीत सिंहपासून घेणार घटस्फोट?

‘या’ बड्या बँकेत झाला कोट्यवधीचा घोटाळा, तुमचं खातं तर नाही ना?

ऑक्टोबरमध्ये तब्बल ‘एवढ्या’ दिवस बॅंका राहणार बंद!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now