Solar Car l अमेरिकेतील (USA) लास वेगास (Las Vegas) येथे झालेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो २०२५ (Consumer Electronics Show 2025) मध्ये ‘अपटेरा मोटर्स’ने त्यांची पहिली प्रोडक्शन इलेक्ट्रिक कार सादर केली. या कारची खासियत म्हणजे ही ईव्ही सौर ऊर्जेवर चालते. इंटिग्रेटेड सौर पॅनेल (Integrated Solar Panels) असलेली ही भविष्यकालीन (Futuristic) कार जगातील पहिली प्रोडक्शन रेडी सौर ऊर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक वाहन आहे.
लवकरच रस्त्यावर धावणार :
कार प्लग इन (Plug In) न करतादेखील दररोज ६० किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ईव्हीसाठी आतापर्यंत सुमारे ५० हजार बुकिंग (Bookings) मिळाले आहेत. ही कार लवकरच रस्त्यावर येईल, असे अमेरिकेतील या स्टार्टअप (Startup) कंपनीने म्हटले आहे.
पॉवर (Power) आणि स्पीड (Speed) :
सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अपटेराच्या पॉवर आणि स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, फ्रंट-व्हील ड्राइव्ह (Front-Wheel Drive) इलेक्ट्रिक कारची सिंगल इलेक्ट्रिक मोटर (Single Electric Motor) जास्तीत जास्त १९८ बीएचपी (BHP) पर्यंतची पॉवर निर्माण करू शकते. ही कार साधारण ६ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते.
रेंज (Range) किती? :
अपटेरा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कारची रचना (Design) अनोखी (Unique) आहे. ही दोन आसनी (Two Seater) कार आहे, जी पंख (Wings) नसलेल्या उडत्या कारसारखी (Flying Car) दिसते. या कारमध्ये ४ सौर पॅनेल्स आहेत. प्रत्येकी एक हूड (Hood), डॅश (Dash), छत (Roof) आणि हॅट (Hat) वर आहे. हे पॅनेल ७०० वॅटपर्यंत (Watt) वीज (Electricity) निर्माण करू शकतात.
एका चार्जवर ६४३ किमीचा प्रवास :
सौर ऊर्जेवर चालणारी ही ईव्ही एका चार्जवर ६४३ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सौर पॅनेल एका तासापेक्षा कमी वेळात ईव्ही पूर्णपणे रिचार्ज (Recharge) करण्यास मदत करू शकतात. कडक उन्हात (Strong Sunlight) चार्ज केल्यास ही कार वर्षाला १६ हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करू शकते.
वजनाने हलकी (Lightweight) :
३ चाकी (3 Wheeler) इलेक्ट्रिक कार बरीच हलकी आहे. कारण ती कार्बन फायबर शीट मोल्डिंग कंपाऊंडपासून (Carbon Fiber Sheet Molding Compound) बनविली आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ईव्हींना पारंपारिक वाहने (Traditional Vehicles) तयार करण्यासाठी लागणाऱ्या भागांच्या दहाव्या भागापेक्षा कमी भाग लागतात.
Title : Aptera Motors unveils the world’s first production-ready solar-powered EV
महत्वाच्या बातम्या-
ग्राहकांना मोठा धक्का! सोनं महागलं, जाणून घ्या दर
किडनी फेल होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; अजिबात दुर्लक्ष करू नका
मुलांमध्ये ‘या’ 3 सवयी असतील तर वेड्यासारखं प्रेम करतात मुली!
पुणेकरांसाठी मोठी गुडन्यूज; पुणे मेट्रोच्या टाईमटेबलमध्ये सर्वात मोठा बदल
पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल, जाणून घ्या नव्या अटी






