Anganwadi workers | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात यावे, यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कर्मचाऱ्यांच्या या मागणीला यश आले असून, आता काही अंगणवाडी सेविका (Anganwadi workers) व मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वर्षे करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पण ही भेट फक्त मुंबई महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांनाच मिळेल.
इतर राज्यात सेवानिवृत्तीचे वय ६० :
सद्यस्थितीला राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अ, ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्ष आहे. त्याचवेळी ड संवर्गातील सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे व इतरही राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात आले आहे. राज्यात सेवानिवृत्तीचे वय फक्त ५८ वर्षे असल्याने त्यात आणखी दोन वर्षांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी प्रामुख्याने उपस्थित केली जाते. दरम्यान, आता काही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वर्षे करण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांना दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला होता. आता त्यांचे सेवासमाप्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आले आहे. पण ही भेट फक्त मुंबई महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांनाच मिळेल. (Anganwadi workers Retirement Age)
Anganwadi workers | मुंबई महापालिकेची मंजुरी :
मुंबई महापालिकेने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सेवासमाप्तीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्व प्राथमिक वर्गावरील संस्थांमार्फत मानधनावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षिकांची सेवासमाप्ती वयोमर्यादा आता ६० वर्ष असणार आहे. मुंबई महापालिकेने या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिलीय. मुंबई महापालिका १ हजार १३९ बालवाड्या चालवते. या अंगणवाड्यांमध्ये जवळपास ३५–४० हजार विद्यार्थी पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहेत.
महापालिकेकडून ह्या बालवाडी आणि प्राथमिक वर्गावर ना नफा, ना तोटा तत्त्वावर सेवाभावी संस्थामार्फत शिक्षिका व मदतनीसांची नियुक्ती करण्यात आली आहे. मानधनावर या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान संबंधित संस्थांना महापालिकेकडून मानधन अदा केले जाते आणि नंतर मग संस्थांमार्फत शिक्षिका आणि मदतनीसांना दिल जातं. (Anganwadi workers Retirement Age)
आधी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ५८ वर्षे होते. पण २०१८ च्या शेवटी सरकारने एक जीआर काढला. ज्यात नव्याने नियुक्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्यात आले. दरम्यान, आता मुंबई महापालिकेतील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय वाढवण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
News title : Approval to raise retirement age of Anganwadi workers in Maharashtra to 60 years






