Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंची आणखी एक मोठी मागणी!

On: January 26, 2024 3:42 PM
Manoj Jarange
---Advertisement---

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोद जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) नेमका काय निर्णय घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. जरांगेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन त्यांच्या भाषणाला सुरुवात केली आहे. मराठा किती ताकदीने आलेत ते देश बघतोय, असं जरांगे यावेळी म्हणालेत.

अंतरवाली सराटीसह राज्यातील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलीये. तसेच हे गुन्हे मागे घेतल्याची सरकारी आदेशाचं पत्र आम्हाला दाखवा. सगळे गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन दिलं होतं, असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा सगळे गुन्हे मागे घेण्याची मोठी मागणी केलीये.

100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षण मोफत करावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलीये. तसेच भरती करताना मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवाव्यात अशी मागणी देखील यावेळी मनोज जरांगे यांनी केलीये.

मनोज जरांगेंची आणखी एक मोठी मागणी!

54 लाख नोंदी सापडल्या आहेत तर त्यांचे प्रमाणपत्र वाटप करा. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांच्या कुटुंबाला प्रमाणपत्र मिळावे. एका नोंदीत पाच जणांना प्रमाणपत्र मिळाल्यास त्याचा कुटुंबाला फायदा होईल. नोंद मिळाल्याची माहिती नसेल तर अर्ज करणार कसा?, असा सवाल जरांगेंनी केलाय.

Manoj Jarange Patil | सग्यासोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र मिळावं- मनोज जरांगे

शिंदे समितीची मुदत वर्षभरासाठी वाढवा अशी मागणी देखील यावेळी मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच सगेसोयऱ्यांसोबतचा अद्यादेश काढावा असं देखील मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं. तसेच ज्याची कुणबी नोंद मिळेल त्याच्या सगेसोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी देखील यावेळी मनोज जरांगे यांनी केलीये.

ज्या 54 लाख नोंदी सापडल्या, नोंद नेमकी कुणाची हे माहिती करायची असेल, तर त्या ग्रामपंचायला मिळालेले कागद चिटकावयाला हवे. तरच नोंदी सापडली का नाही हे माहित होईल. तरच तो व्यक्ती प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Republic Day 2024 | प्रजासत्ताक दिनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्वांत मोठी घोषणा!

Manoj Jarange Patil | आझाद मैदानावर जाण्यावर मनोज जरांगे ठाम; सर्वांना सरकारचा जीआर वाचून दाखवणार

Manoj Jarange | “झोपेत असताना पोलिसांनी..”; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

Manoj Jarange | मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; जरांगेंच्या मागण्या मान्य

Manoj Jarange | सरकारचा जीआर घेऊन जरांगेंच्या भेटीसाठी आलेल्या मंगेश चिवटेंना भोवळ

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now