Manoj Jarange l गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरले आहे. मात्र आता आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात चक्क मराठा समाजाचे नेतेच आक्रमक झाले आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणावरून मराठा समाजामध्ये फूट पडती की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मनोज जरांगे यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन :
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मराठा समाजाचे कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांनी आठ दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना काही प्रश्न विचारले होते. त्यावेळी मनोज जरांगे पाटलांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आठ दिवसांत न दिल्यास 9 सप्टेंबरपासून मनोज जरांगे यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा अण्णासाहेब शिंदे यांनी दिला होता. मात्र मनोज जरांगे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही. त्यामुळे बार्शीतील मराठा समाजाचे कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
Manoj Jarange l अण्णासाहेब शिंदे काय म्हणाले :
यावेळी आंदोलनात अण्णासाहेब शिंदे म्हणाले की, मी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना काही प्रश्न विचारले पण मला त्यांनी उत्तरे दिले नाहीत . मात्र आता मी त्यांना प्रश्न विचारले ही माझी चूक झाली का? मराठा आरक्षणाला खुट्टा शरद पवार यांनीच मारला आहे. पण मात्र तुमच्या डोक्यात काही तरी हवा शिरली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा समाजाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे, तो कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून रात्रंदिवस राबला आहे. तसेच राजेंद्र राऊत सारख्या माणसाचा विरोधात तुम्ही बोलला, तसेच त्यांच्या कुटुंबातील लोकविषयीं देखील बोललात.
मात्र हे लक्षात ठेवा बार्शी तालुक्याला सांभाळणारा ढाण्या वाघ हा राजेंद्र राऊत आहे, त्यांना सांभाळणारी रणरागिणी ही आमची माऊली आहे. त्यामुळे त्यांच्या विषयी बोललात तर याद राखा, तुम्हाला बोलायला तोंड असेल तर आमच्याकडे देखील तोंड आहे. तसेच एक महिन्याची मुदत मला द्या, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून दाखवतो. मराठा आरक्षण समन्वयक समिती करून आपण आरक्षणावर काम करू. तसेच मी समाजाचा मालक नाही, प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार राहील असे मराठा कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे म्हणाले आहेत.
अण्णासाहेब शिंदे यांनी विचारली हे प्रश्न :
– महायुतीचे सरकार OBC मधून आरक्षण देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे का?.
– लोकसभा निवडणुकीत तुम्ही माविआचा खासदार निवडून आणला, मात्र त्यांनी एकदा देखील निवडून आल्याची जाणीव ठेवली नाही. त्यामुळे OBC मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला का?.
– मनोज जरांगे पाटील तुम्ही आत्ता देखील महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र तुमच्या या भूमिकेमुळे गरजवंत मराठा समाज माविआला मतदान करेल का?.
– आपण भूमिका घेतली त्यामुळे महाविकास आघाडीच सरकार सत्तेत येणार हे मान्य का?
News Title – Annasaheb Shinde protest against Manoj Jarange
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; पुण्यातील बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
संतापजनक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाला ट्रेनच्या टॉयलेटमध्ये टाकून अज्ञात पालक पसार
कोथिंबीरच्या जुडीने खाल्ला भाव! एका जुडीची किंमत पाहून व्हाल थक्क
राज्यात आज मुसळधार! जाणून घ्या तुमच्या शहराला कोणता अलर्ट?
धक्कादायक! पुण्यात टेम्पो चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं, जागीच मृत्यू






