“तुम्ही ज्यावर प्रेम केलं, तो सूरज आता तसा नाही…”; कोकण हार्टेड गर्लने वादावर मौन सोडलं

On: November 14, 2024 9:56 AM
ankita walawalkar talks on suraj chavan
---Advertisement---

Ankita Walawalkar | बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या सीझनमध्ये सूरज चव्हाण ते ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे. सूरजने तर या सीझनचा किताबही जिंकला आहे. शो संपल्यानंतर अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण यांच्यात नवीन वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात हा वाद सुरू आहे. (Ankita Walawalkar)

नुकतीच अंकिता सूरजला भेटायला त्याच्या गावी गेली होती. तेव्हा तिथे तिला मिळालेली वागणूक आणि त्यानंतर सूरजच्या अकाऊंटवरून तिचे काढून टाकण्यात आलेले फोटो,यामुळे दोघांत काहीतरी बिनसल्याचे म्हटले जात आहे. या वादावरच आता अंकिताने अखेर मौन सोडलं आहे.

या वादादरम्यान अंकिताने ‘माझ्याकडून यापुढे कोणत्याही अपेक्षा नसाव्यात’ असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर तिने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यात अंकिताने सूरजविषयी तिला काय वाटतं तसेच, नेमका काय वाद झाला याबाबत तिने स्पष्ट केलंय. सूरज खूप भोळा आहे आणि त्याच्या आजूबाजूचे लोक या भोळेपणाचा फायदा घेत आहेत, असं अंकिताने म्हटलंय.

नेमकं काय म्हणाली अंकिता?

सुरजला मी 70 दिवसपासून ओळखते, बिग बॉसमध्ये आमचा एकत्र प्रवास झालाय. तो मुलगा अतिशय भोळा आहे, त्याला काही कळत नाही. मी त्याला याच गोष्टीसाठी नॉमिनेट करत होते की त्याला त्याचं मत मांडता येत नाही. त्याच गोष्टीमुळे आज त्याला होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यात मला अडकवण्याचा जो प्रयत्न केला जातोय, तो मला सहन होण्यापलीकडे झालाय. सूरजवर कोणीही काहीही राग ठेवू नका. त्या मुलाला जसं सांगितलं जातं तसं तो करतोय. मला याची गॅरंटी आहे की त्याला असं सांगितलं असणार की अंकिताने(Ankita Walawalkar)तुझ्याबद्दल काहीतरी वाईट फिरवलंय. त्यामुळे त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका.

“प्रत्येक वेळी बोललं जातं की कुठेय ती, ती तर फेमस होण्यासाठी करतेय, ती का नाही आली? सूरजच्या गोष्टींमध्ये जेवढं मी लक्ष देण्याचा प्रयत्न करते, तेवढं मला बाजूला केलं जातं. माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. माझं सतत शूटिंग सुरू आहे, मी सतत ट्रॅव्हल करतेय. एवढं काम माझ्याकडे असताना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही. ही प्रसिद्धीसाठी करतेय, असं म्हटलं गेलं तेव्हा मी दुर्लक्ष केलं. सूरजच्या जीवावर काही जणांचे बरेच युट्यूब चॅनल चालतायत. ते प्रत्येक वेळी मला टार्गेट करतायत.” (Ankita Walawalkar)

YouTube video player

“देवाने त्याला जे दिलंय, ते..”

“मी महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगू इच्छिते की तुम्ही ज्या सूरजवर प्रेम केलंत, तो सूरज बाहेर आल्यावर तसा नाहीये. तो गणपतीच्या मूर्तीच्या मातीसारखा आहे. त्याला जसा आकार द्याल तसा तो घडेल. तो स्वत:चं मत मांडत नाही. त्याच्या आजूबाजूचे लोक चुकीच्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करत आहेत. कारण ते त्यांच्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करत आहेत. मला जेवढं शक्य होईल, तेवढं माझं सूरजवर लक्ष राहील, पण या दलदलीत मला पडायचं नाही. माझ्याकडे माझी खूप कामं आहेत. मी नको असेन तर बाजूला होईन, पण त्यासाठी एवढं सगळं करू नका. त्या मुलाला चुकीचं मार्गदर्शन करू नका. देवाने त्याला जे दिलंय, ते टिकू दे आणि वाढू दे अशी माझी इच्छा आहे. त्याच्या जीवावर इतर सगळेजण मोठे झाले तर ते मला खूप वाईट वाटेल” असं अंकिता (Ankita Walawalkar) म्हणाली.

News Title –  ankita walawalkar talks on suraj chavan 

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! नितीन राऊत यांच्या कारचा भीषण अपघात, प्रचारावरून परततानाच..

“सर्वांनी मिळून माझा लोकसभेत पराभव केला”; नवनीत राणांचं महायुतीलाच आव्हान

“स्वतःला मर्द समजणाऱ्या ठाकरेंच्या बॅगमध्ये लिपस्टिक-लाली..”; नितेश राणेंची खोचक टीका

आज वैकुंठ चतुर्दशी, श्रीहरी व महादेवाची कृपादृष्टी कुणावर असणार?; वाचा राशीभविष्य

अभिषेकसोबत अफेरच्या चर्चांवर निम्रत कौर अखेर बोलली, व्हिडीओ तूफान व्हायरल

Join WhatsApp Group

Join Now