Ankita Walawalkar Marriage l बिग बॉस मराठी 5 मध्ये ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने तिच्या खेळातून अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता वालावलकर ही ग्रँड फिनाले पोहचली. परंतु ती पाचव्या स्थानावरुन बाहेर पडली. मात्र ट्रॉफीच्या अगदी जवळ येऊन अंकिताचा प्रवास संपला.
अंकिता लग्नबंधनात कधी अडकणार ? :
मात्र बिग बॉसच्या घरात अंकिता वालावलकरने तिची एक वेगळी शैली तयार केली होती. त्याचप्रमाणे तिच्या खेळाची देखील प्रचंड चर्चा झाली आहे. मात्र अंकिता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरात जाण्याआधी देखील तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेप्रचंड चर्चेत आली होती. कारण अंकिताने स्वत:च तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे अंकिता बिग बॉसच्या घर,अधे जाण्याआधीपासूनच लग्नबंधनात कधी अडकणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे. पण घराबाहेर आल्यानंतर अंकिताने तिच्या लग्नाविषयी एक महत्वाची माहिती दिली आहे.
Ankita Walawalkar Marriage l कोकण हार्टेड बॉय नेमका कोण? :
संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न पडला आहे अंकिता लग्न कधी करतेस? आणि तो कोकण हार्टेड गर्लचा बॉयफ्रेंड कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर देताना अंकिताने तिच्या लग्नाचा संपूर्ण प्लॅन सांगितला आहे. अंकिताने म्हणाली की, कोकण हार्टेड बॉय नेमका कोण आहे, हे तुम्हाला लवकरच समजणार आहे.
याशिवाय माझा विचार फेब्रुवारीच्या आधी लग्न करण्याचा होता, मात्र सध्या बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर प्रचंड काम आहेत. त्यामुळे आता बघु सगळं कसं जमतंय… पण फेब्रुवारी महिन्याच्या आधी संपूर्ण महाराष्ट्राला निक्कीच कळेल की कोकण हार्टेड बॉय नेमका कोण आहे… तसेच लग्न मी सिंधुदुर्ग येथेच करणार आहे.. मात्र ते छोटं असेल पण मुंबईत येऊन मी सर्वांना रिसेप्शन पार्टी नक्की देणार आहे.
News Title – Ankita Walawalkar Marriage
महत्त्वाच्या बातम्या-
PM किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळाला नाही? मग येथे करा थेट तक्रार
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसची गरजू महिलांसाठी मोठी घोषणा!
गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर
जम्मू-काश्मीर, हरियाणाचा कौल कुणाला?; आज होणार निकाल जाहीर
मुंबई म्हाडाच्या 2030 घरांची आज सोडत, घर मिळालं की नाही ते ‘असं’ करा चेक






