कोकण हार्टेड गर्लचे सूर जुळले; सांगितलं बॉयफ्रेंडच नाव

On: October 12, 2024 11:32 AM
Ankita Walawalkar Boyfriend
---Advertisement---

Ankita Walawalkar Boyfriend l बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. कारण पाचवा सीझन प्रचंड गाजला आहे. अशातच बिग बॉसमध्ये गाजलेली स्पर्धक ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे. अंकिता बिग बॉसच्या घरात असल्यापासूनच तिच्या होणाऱ्या जोडीदाराची प्रचंड चर्चा सुरु होती. मात्र आता स्वतः अंकिताने तिचा जोडीदार कोण आहे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे.

अंकिताने केला मोठा खुलासा :

अंकित वालावलकरने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच फोटो शेअर करताना अंकिताने तिच्या जोडीदारासाठी देखील खास पोस्ट लिहिली आहे. याशिवाय अंकिताने तिच्या जोडीदारासाठी खास फोटो शेअर करत ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याची घोषणा देखील केली आहे.

याशिवाय ‘कोकण कार्टेड गर्ल’ अंकिताने इंस्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत ‘सूर जुळले’ असं कॅप्शन देखील दिलं आहे. अंकिता वालावलकरचा बॉयफ्रेंड हा देखील एक कलाकार आहे. तसेच तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रचंड सक्रिय आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अंकिता वालावलकरच्या बॉयफ्रेंडचं नाव हे कुणाल भगत आहे.

Ankita Walawalkar Boyfriend l कोकण हार्टेड गर्लचे सूर जुळले :

अंकिताचा बॉयफ्रेंड कुणाल हा एक संगीत दिग्दर्शक आहे. त्याने अनेक गाणी, चित्रपट आणि टीव्ही मालिकांचं संगीत दिग्दर्शन देखील केलं आहे. यामुळे कोकण हार्टेड गर्ल अंकिताने कुणाल सोबतच फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याच्यासाठी ‘सूर जुळले’ असं खास कॅप्शन दिलं आहे.

यासोबतच अंकिताने बॉयफ्रेंड कुणालसाठी आणखी एका खास पोस्ट देखील शेअर केली आहे. त्यावेळी तिने कॅप्शन मध्ये लिहलं आहे की, “प्रेम हे एकमेकांसाठी जगणं आहे, हे तू सांगितलंस, काळाच्या ओघात कळलच नाही, आयुष्य कसं कुठे बदललं, तू भेटलास आणि पुन्हा जगावसं वाटलं. वचन देते एका सुखी कौटुंबिक आयुष्याची तुझी सहचारिणी असेन. दसऱ्याच्या शुभेच्छा.”

News Title – Ankita Walawalkar Boyfriend Kunal Bhagat

महत्त्वाच्या बातम्या-

विखे पाटलांच्या आशीर्वादाने पुण्यातील ‘या’ भागातील दोनशे कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न!

सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदूंना मोठं आवाहन; थेट म्हणाले..

दसऱ्याच्या मुहूर्तालाच सोनं महागलं, जाणून घ्या 10 ग्रॅमचे लेटेस्ट दर!

दसऱ्यावर पावसाचं सावट, आज ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार!

महिलांना पार्ट टाइम जॉब, 11 हजार पगार देणार; महायुती सरकारची मोठी घोषणा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now