Disha Salian | दिशा सालियानविषयी अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा!

On: January 2, 2024 2:16 PM
Disha Salian
---Advertisement---

Disha Salian | अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचा (Disha Salian) दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. दिशा सालियनने मुंबईतील मालाड येथील एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केला होती. पण दिशाचे कुटुंबीय हे मान्य करायला तयार नव्हते ना दिशाला जवळून ओळखणारे लोक. प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता की दिशा सोबत नक्की काय झालं?.

Disha Salian विषयी अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा

दिशा सालियनने (Disha Salian) आत्महत्या केली? की तीच्या मृत्यूमागे काही षडयंत्र होतं? दिशा सालियनच्या मृत्यूला 3 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, मात्र आजपर्यंत हे गूढ उकललेलं नाही. आता या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याचे आदेश आले असून, त्यासाठी एक एसआयटीही स्थापन करण्यात आली आहे, जी या प्रकरणातील सर्व बाबींची फेरतपासणी करून तळागाळापर्यंत पोहोचेल.

महाराष्ट्र सरकारच्या आदेशानंतर या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू झाली असून, स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचे नेतृत्व पोलिस उपायुक्त अजय बन्सल करणार आहेत. या प्रकरणात काही बड्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ते चौकशीतून समोर येईल. आता दिशाबाबत सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने मोठा खुलासा केला आहे.

Disha Salian विषयी काय म्हणाली अंकिता?

अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच दिशा सालियानविषयी व्यक्त झाली. मुनव्वर फारुकीशी बोलताना अंकिताने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात सुशांतचा उल्लेख केला.

मुनव्वर तिला विचारतो, “सुशांतच्या मॅनेजरचं निधन त्याच्या निधनाच्या आधी झालं की नंतर?” त्यावर ती त्याची मॅनेजर नव्हती. तिने फक्त एकदा पाच ते सहा दिवसांसाठी सुशांतचं काम पाहिलं होतं, त्याला मॅनेज केलं होतं. पण ती त्याची मॅनेजर नव्हती, असं अंकिता सांगते.

बऱ्याच गोष्टींमुळे तो पूर्णपणे खचला होता. त्याच्या आयुष्यात हे सर्व घडत असताना मी त्याच्यासोबत नव्हते. त्याच्या निधनानंतर मला काही सुचतच नव्हतं, असंही अंकिताने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-  

Maharashtra Politics | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!

Aishwarya Rai-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय!

Kasganj News | ‘थंडीचा त्रास होतोय, मला बायको हवीये…’; तरूणाने थेट पोलीस स्टेशन गाठलं

Weather Update | ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

David Warner ने आपल्या चाहत्यांना दिला धक्का; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now