श्रीकृष्णाची पूजा करताना अंकिता लोखंडेकडून चूक, नेटकरी भडकले!

On: August 27, 2024 2:32 PM
Janmashtami 2024
---Advertisement---

Janmashtami 2024 l संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अगदी मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. तसेच सर्वांच्या घरोघरी देखील कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटी देखील या उत्साहात तल्लीन होऊन मोठ्या आनंदाने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतात. अनेक कलाकारांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच अभिनेत्री अंकिता लोखंडेने देखील श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती श्रीकृष्णाची पूजा करत आहे. मात्र यावेळी नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे.

अंकिता लोखंडेवर नेटकरी भडकले :

अभिनेत्री अंकिता लोखंडेनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी श्रीकृष्णाची पूजा केली आहे. त्यावेळी तिने पूजा करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अंकिता श्रीकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करत आहे. पण अभिनेत्री अंकिताची एक गोष्ट नेटकऱ्यांना चांगलीच खटकली आहे.

अभिनेत्री अंकिता या व्हिडिओमध्ये बाथरोबमध्ये दिसत आहे. तर तिच्या केसाला देखील तिने टॉवेल गुंडाळल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र अंकिताने या लूकमध्ये पूजा केल्याने नेटकऱ्यांना प्रचंड खटकलं आहे. अंकिताचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे.

https://www.instagram.com/lokhandeankita/?utm_source=ig_embed&ig_rid=21278c19-9b92-4db4-bfc1-f221faf2263a

Janmashtami 2024 l अंकिताच्या या गोष्टी नेटकऱ्यांना खटकल्या :

अंकिताच्या या व्हिडिओवर नेटकरी कमेंट करून म्हणाले की, पूजा करताना तरी ड्रेस नीट घालायचा, असा ड्रेस घालून कोण पूजा करतं, ही पूजा नाही तर फक्त ड्रामा आहे. कपडे देखील व्यवस्थित घातलेले नाहीत अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडिओवर टाकल्या आहेत.

याशिवाय अंकिताने डाव्या हातात अगरबत्ती पकडल्याने देखील नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. या गोष्टीवरून देखील नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहे. उलट्या हाताने आरती करत नसतात, अगरबत्ती ही उलट्या हातात पकडत नाहीत अशा प्रकारच्या अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

News Title – Ankita Lokhande Janmashtami Video 2024

महत्त्वाच्या बातम्या-

मंकीपॉक्स टेस्ट करणं झालं सोपं; अवघ्या ‘इतक्या’ वेळात होणार टेस्ट

अत्यंत भयंकर! तरूणीसोबत घडलेल्या घटनेनं पुणे हादरलं

रोज सकाळी फक्त 1 किलोमीटर चालल्याने किती कॅलरिज बर्न होतात?

निक्कीच्या ‘त्या’ वागण्यामुळे अरबाजने घरात केली तोडफोड; बिग बॉस काय करणार?

बँकेत नोकरी करायचं स्वप्न होणार साकार; तब्ब्ल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now