मकोका लागताच वाल्मिक कराडचा आणखी एक धक्कादायक मॅटर समोर!

On: January 15, 2025 10:55 AM
Anjali Damaniya new tweet on Walmik Karad
---Advertisement---

Anjali Damaniya | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोपी वाल्मिक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आज वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. आतापर्यंत सरपंच हत्याकांडात आठ आरोपींवर मकोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Anjali Damaniya)

त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी वाल्मिक कराडबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अंजली दमानिया बीडमधील गुन्हेगारी तसेच वाल्मिक कराडबाबत सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत. अशात त्यांनी केलेले एक नवीन ट्वीट चर्चेत आले आहे.

वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत नवीन प्रकरणाची एफआयआर दाखवत आरोप केला आहे. त्यांनी यासंदर्भात गृहमंत्र्यांना देखील गंभीर सवाल केले आहेत.

अंजली दमानिया यांचं ट्वीट-

वाल्मिक कराड आणि एका वेगळ्या प्रकरणात झालेला आणखी एक मोठा FIR. गृहमंत्र्यांनी आम्हाला सांगावे की या FIR वर काय कारवाई केली गेली.

FIR क्रमांक ०१०८ / २०२४
तारीख ३ जुलै २०२४

आयपीसी ३०७ : जीवे मारण्याचा प्रयत्न करणे.

आयपीसी ३२३ : स्वेच्छेने दुसऱ्याला मारण्याच्या किंवा दुखापत करण्याच्या हेतूने त्रास देते किंवा एखाद्याने शरीराच्या कोणत्याही भागाला इजा पोहोचवणे

आयपीसी ३२६ : धोकादायक शस्त्रांनी स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे

आयपीसी ५०४ : “जो कोणी हेतुपुरस्सर अपमान करतो आणि त्याद्वारे कोणत्याही व्यक्तीला चिथावणी देतो, अशा चिथावणीमुळे सार्वजनिक शांतता भंग होईल किंवा इतर कोणताही गुन्हा केला जाईल असा हेतू आहे किंवा हे माहित आहे.

आयपीसी ५०६ : गुन्हेगारी धमकी

आयपीसी १४३ असा हल्ला करण्याच्या चिथावणीचा परिणाम हल्ला घडून आल्यास

आयपीसी १४८ दंगल, प्राणघातक शस्त्रांनी सज्ज. — जो कोणी दंगल घडवून आणला असेल, प्राणघातक शस्त्राने सज्ज असेल किंवा गुन्ह्याचे हत्यार म्हणून वापरलेले, मृत्यूस कारणीभूत असण्याची शक्यता असेल अशा कोणत्याही गोष्टीने दोषी असेल

आयपीसी १४९ बेकायदेशीर असेंब्लीचा प्रत्येक सदस्य सामान्य वस्तूच्या खटल्यात केलेल्या गुन्ह्यासाठी दोषी आहे. (Anjali Damaniya)

ह्या व्यतिरिक्त

शास्त्र अधिनियम ३

शास्त्र अधिनियम ४

शास्त्र अधिनियम २५

दरम्यान, सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी (14 जानेवारी) मोठा धक्का बसला. सरपंच हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा ठपका ठेवत कराडवर मकोका ( MACOCA ) लावण्यात आला. मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज वाल्मिक कराडला (Walmik Karad ) केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

News Title :  Anjali Damaniya new tweet on Walmik Karad

महत्वाच्या बातम्या-

अजित दादांचा धनंजय मुंडेंना मोठा धक्का?, बीडमध्ये मोठ्या घडामोडी

वाल्मिक कराडवर मकोका लागताच परळीत तणावपूर्ण शांतता, आता पुढील कारवाई काय?

पंतप्रधान मोदी आज मुंबईत, ‘असा’ असणार संपूर्ण दौरा!

किंक्रांत! आज ‘या’ राशींनी राहावे सावध, वाचा बुधवारचे राशीभविष्य

वाल्मिक कराडवर मोक्का लागताच सुरेश धसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Join WhatsApp Group

Join Now