बीडचं वातावरण तापणार! वाल्मिक कराडसह 4 बड्या नेत्यांची नावे समोर

On: December 26, 2024 11:37 AM
Santosh Deshmukh Case
---Advertisement---

Santosh Deshmukh l बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. मात्र या घटनेतील प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत. त्यामुळे या धक्कादायक प्रकरणातील आरोपी आणि मास्टरमाईंडला अटक न झाल्याने गावकऱ्यांसह विरोधक देखील संताप व्यक्त करत आहेत. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्वीटने राज्यातील राजकीय वातावरण आणखीनच तापणार असल्याचं दिसत आहे.

अंजली दमानिया यांनी घेतली आक्रमक भूमिका :

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत. मात्र या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडीकडे) वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातून बीड पोलिसांचा रोल संपला असल्याचं दिसून येत आहे.

मात्र या हत्याप्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच सरपंच संतोष देशमुख प्रकरणात राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मौन का बाळगले आहे असा सवाल देखील अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

Santosh Deshmukh l वाल्मिक कराडसह चार आमदारांची नावे :

दरम्यान, आज अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून पिस्तुलीचा होत असलेल्या गैरप्रकारावर ट्वीट केलं आहे. मात्र या ट्विटमुळे बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र आता वाल्मिक कराडच्या नावासह आता बीड जिल्ह्यातील बड्या नेत्यांची नावे समोर आल्याने चर्चांना प्रचंड उधाण आले आहे. .

अंजली दमानिया यांनी ट्वीटमध्ये वाल्मिक कराडसह चार आमदारांची नावे घेतली आहे. यामध्ये धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, पंकजा मुंडे किंवा या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला छळून जमिनी बळकावल्या असतील, तसेच खंडणी मागितली असेल किंवा कार्यकर्ते बंदूक दाखवून दहशत पसरवत असतील तर आमच्या 9235353500 ह्या नंबर वर कळवण्याचे आवाहन केले आहे.

News Title : anjali damania tweet on walmik karad and beed mlas

महत्वाच्या बातम्या –

अलर्ट! ‘या’ जिल्ह्याला 2 दिवस वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

आज ‘या’ राशींना मेहनतीचे फळ मिळणार? धनलाभ होणार

हे कसलं प्रेम!, प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तरूणाचं भयंकर कृत्य

विनोद कांबळीच्या मदतीला शिंदेसेना, वानरसेनेनेही उभे केले २० लाख रुपये!

मुख्यमंत्र्यांना हवयं ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्री पद! कोणता आहे तो जिल्हा?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now