‘दाते पंचांग बघून…’; कराडच्या शरणागतीवर अंजली दमानियांना संशय

On: December 31, 2024 5:59 PM
Anjali Damania
---Advertisement---

Walmik Karad |  बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आज अखेर पुण्यातील सीआयडीला शरण आला आहे. पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये कराडने शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. वाल्मिकी कराड शरण आल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

दाते पंचांग बघून आत्मसमर्पण- अंजली दमानिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकारणावर प्रतिक्रिया दिली आहे. दाते पंचांग बघून आज कराडने आत्मसमर्पणे केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं? खरतर, ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. 17 तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडर पुण्यातच झाले ह्याचा अर्थ इतके दिवस ते पुण्यातच होते. पुण्यात राहून पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का ? पोलिस इंटेलिजेंस काय करत होतं? हे राजकारणी त्यांना संरक्षण देत होते ह्यात शंकाच नाही, असंही दमानिया यांनी म्हटलंय.

वाल्मिकी कराडवर संतोष देशमुख प्रकरणात सुरुवातीपासूनच आरोप करण्यात येत होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर त्याने आज पुण्यात शरणागती पत्कारली, तो सीआयडीला शरण आला आहे.

वाल्मिकी कराड शरण आल्यानंतरही विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरूच आहे. पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही यावर संशय व्यक्त केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप  केले आहेत. तसेच कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“राजीनामा काय आता चिखलफेकही सहन केली जाणार नाही”; ओबीसी समाज आक्रमक

‘पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने…’; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर संभाजीराजेंनी फडणवीस अन् अजितदादांना केलं टार्गेट!

“तर इतके दिवस…”, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया समोर

बंदोबस्त कमी, शरण येण्याची शक्यता नाही?… तोच पांढऱ्या स्कॉर्पिओतून कराडची एन्ट्री… नेमकं काय घडलं?

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now