वाल्मिक कराड मुंडेंकडे घरगडी म्हणून होता, मग एवढी संपत्ती कशी आली?

On: January 15, 2025 3:35 PM
Walmik Karad
---Advertisement---

Walmik Karad l मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ला हत्या करण्यात आली. मात्र या हत्येला एका महिन्याहून अधिक कालावधी उलटला असला तरी देखील हे प्रकरण अजूनही प्रचंड चर्चेत आहे. कारण या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड संदर्भात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

कराडकडे इतकी अफाट संपत्ती कशी आली? :

मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडने कमवलेल्या संपत्तीचे विवरण देत कधीकाळी घरगडी असलेल्या व्यक्तीकडे इतकी अफाट संपत्ती कशी आली? यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

यावेळी अंजली दमानिया म्हणाल्या की, “वाल्मिक कराडकडे इतका अफाट पैसा कुठून आला? तसेच अवघ्या काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडने एक वाईन शॉप आणि त्याची दुकान आणि जमीन ही तब्बल एक कोटी 69 लाखाला विकत घेतल्याची माहिती आहे. मात्र कराडकडे एवढे पैसे आले कुठून याची चौकशी ईडीने करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Walmik Karad l कराडवर एकूण 14 एफआयआर :

दरम्यान, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्याकडे काही दिवसांपूर्वी साधे काम करत होता. तसेच तो गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे देखील आधी घरगडी म्हणून काम करत होता. मग या माणसाची इतकी मोठी प्रॉपर्टी कशी झाली? मात्र आता या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी? असं दमानिया यांनी म्हंटल आहे.

याशिवाय वाल्मिक कराड याच्यावर एकूण 14 एफआयआर आहेत. त्यामधील 14 पैकी दहा परळीमध्ये दाखल आहे. तरी देखील त्याला शासकीय बॉडीगार्ड कसा दिला गेला? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. तर आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे धनंजय मुंडे यांनी दिले पाहिजे असं दमानिया यांनी म्हंटल आहे.

News Title :  Anjali Damania demands ED inquiry into Walmik Karad  Property

महत्वाच्या बातम्या-

केज पोलीस ठाण्याबाहेर ब्लॅक गाडीच्या घिरट्या, नेमकं प्रकरण काय?

लाडक्या बहीणींनो ‘या’ दिवशी मिळणार जानेवारीचा हप्ता?, मोठी अपडेट समोर

धनंजय मुंडेंवर अन्याय का? मविआच्या नेत्याचा सवाल

गुड न्यूज! सोने-चांदीत आली स्वताई, ‘इतक्या’ हजारांची झाली घसरण

महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची योजना, 26 जानेवारीला घोषणा होण्याची शक्यता

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now