वाल्मिक कराडवर 23 गुन्हे, गुन्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांकडे देणार; सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक

On: December 23, 2024 10:10 PM
Valmik Karad
---Advertisement---

Valmik Karad l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. तसेच या हत्येचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील उमटले आहेत. मात्र आता या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.

वाल्मिक कराड यांना फरार केलं गेलं आहे का? :

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, वाल्मिक कराड यांच्यावर फक्त परळीमध्येच तब्बल 23 गुन्हे आहेत. तसेच त्यांच्यावर एकेक सेक्शन 4-5 वेळा लागले आहेत. म्हणजेच याचा अर्थ वाल्मिक कराड हा प्रचंड माहीर गुन्हेगार आहे. मात्र आता संतोष देशमुख हत्याकांड झाल्यानंतर ते फरार आहेत. तसेच वाल्मिक कराड यांना फरार केलं गेलं आहे का? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

याशिवाय माझ्याकडे वाल्मिक कराड यांच्या गुन्हांची लिस्ट आहे. त्यामधील गुन्हे हे गंभीर आहेत. तसेच त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर लायसन्स नसताना आर्म्स ॲक्टखाली ( 3/24 आणि 4/25 ) सीरियस गुन्हे दाखल आहेत. तरी देखील तो माणूस अगदी आरामात फिरत आहे.तसेच त्याला काहीच शिक्षा होत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याची खंत अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे.

Valmik Karad l कराडांच्या गुन्ह्याची संपूर्ण यादी मुख्यमंत्र्यांना दाखवणार :

आज बीडमध्ये जी दहशत निर्माण केली आहे, ते काय काय करतात हे बीडच्या कोणत्याही सामान्य माणसाला विचारलं ना तर ते सांगतील. तसेच खंडणी वगैरे त्यातले फार चिल्लर गोष्टी आहेत, त्याच्यापेक्षा अतिशय गंभीर गुन्हे हे सर्रास करत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी लावला आहे.

मात्र आता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना गुन्ह्याची संपूर्ण यादी दाखवणार आहे. तसेच तुम्हाला धनंजय मुंडे यांच्यासारख्या लोकांना मंत्रीपद का द्यावसं वाटलं? असा सवाल देखील मी मुख्यमंत्र्यांना विचारणार असल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे.

News Title :Anjali Damania Demands Arrest of Valmik Karad

महत्वाच्या बातम्या –

महसूलमंत्री अ‍ॅक्शनमोडमध्ये! वाळू माफीयांचे धाबे दणाणले

ऐन थंडीत पावसाचं सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली; पाहा कुठे-कुठे बरसणार?

‘या’ आठवड्यात ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार, पाहा सुट्ट्यांची यादी

अल्लू अर्जुनच्या घराच्या मोडतोडप्रकरणी वडिलांनी दिली पहिली प्रतिक्रिया!

महिलांची संक्रांत गोड होणार, जानेवारीतच मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now