धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, SIT बरखास्त करून…; मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी कुणी केली?

On: January 7, 2025 10:19 AM
Anjali Damania Big Demand to CM Fadnavis
---Advertisement---

Anjali Damania | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन महाराष्ट्रातील वातावरण प्रचंड तापलेले आहे. या प्रकरणात अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे देखील अडचणीत सापडले आहेत. हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंडे यांच्याविरोधात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) देखील आक्रमक झाल्या आहेत.

त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत मोठी मागणी केली आहे. अंजली दमानिया यांनी काल (6 जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीडमधील हत्याप्रकरणावरून त्यांना मिळत असलेल्या धमक्यांसदर्भात माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या या भेटीमध्ये काही मागण्या देखील केल्या आहेत. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अंजली दमानिया यांनी सोशल मीडियार एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागण्यांची माहिती दिली आहे. त्यांनी एकूण 10 मोठ्या मागण्या केल्या आहेत. या मागण्या नेमक्या काय आहेत, ते पाहुयात

अंजली दमानिया यांच्या 10 मोठ्या मागण्या-

  1. संतोष देशुखांच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
  2. धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे.
  3. SIT बरखास्त करुन बीड जिल्ह्याबाहेरच्या चांगल्या ऑफिसर्सनी तपास करावा.
  4. तपास on camera झाला पाहिजे.
  5. बीड मधे एक hotline नंबर सुरू करण्यात यावा. तक्रार देणाऱ्यांची गुप्तता बाळगण्यात यावी.
  6. बिंदुनामावली बीड मधे पाळली जात नाही. त्याची सत्यता बघण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात यावे.
  7. सगळे सत्र परवान्यांची चौकशी करण्यात यावी.
  8. परळी Thermal project येथे एक स्पेशल फोर्स लावण्यात यावा व हा परिसर सीसीआयटीने कवर करण्यात यावा. राख माफिया बंद करण्यासाठी हे करण्यात यावे. (Anjali Damania)
  9. ज्या वाहनांनावर नंबर प्लेट्स नाही अशी सगळी वाहने जप्त करण्यात यावी.
  10. पवन चक्कीची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात यावी व यातून येणारे भाडे हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावे.

News Title –  Anjali Damania Big Demand to CM Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदवार्ता! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, काय आहेत सध्या दर?

अलर्ट! महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव, ‘या’ ठिकाणी आढळले रुग्ण

यंदाच्या वर्षी विवाहासाठी शुभ मुहूर्त किती?, पाहा संपूर्ण लिस्ट

आजपासून शाकंभरी नवरात्रोत्सव प्रारंभ, देवी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी?

’20 मिनिटांत आणून सोडतो म्हणत 36 व्या काॅलनंतर…’; सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा!

Join WhatsApp Group

Join Now