सुप्रियाताईंना देखील लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मिळणार?

On: August 17, 2024 4:40 PM
Supriya Sule
---Advertisement---

Supriya Sule l राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. “सुप्रिया सुळेंचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असेल तर त्यांना देखील लाडकी बहीणचे 1500 देऊ” अशी टीका त्यांनी केली आहे.

अनिल पाटलांनी राज्य सरकारवर केला घणाघाती आरोप :

नंदुरबार येथे अनिल पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी योजनेतून सरकार महिलांना लाच देत नाही तर भाऊबीजेची ओवाळणी देत आहे. उद्धव ठाकरे यांना बहिणीला दिलेली ओवाळणीला लाच म्हणून ते राज्यातील महिलांचा अपमान करत आहेत, तसेच राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा मोठा निर्णय आम्ही घेतला आहे.

मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तो मागे घेण्याचा निर्णय नक्कीच घेतला जाईल. तसेच राज्यातला शेतकरी, युवक, युवती किंवा महिला असतील हेच सरकार परत आणण्यासाठी जबाबदारीने काम करत आहे.

Supriya Sule l खासदार सुप्रिया सुळे नेमक्या काय म्हणाल्या? :

यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, बहिणीचं नातं आमच्या भावाला कधी कळलंचं नाही. कारण प्रेमात पैसे आले की ते नातं कधीही होतं नाही. तसेच प्रेमात आणि व्यवसायामध्ये माझ्या भावांनी मोठी गल्लत केली आहे. तर लाडक्या बहिणीचं नातं हे 1500 रुपयात विकत घेता येत नाही. त्यांचं नातं फक्त मताशी जोडलेलं असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

याशिवाय जर व्यवसायात प्रेम नसते किंवा जर प्रेमात पैसे आले तर त्याला कधीही नातं म्हणता येत नाही. त्यामुळे सध्या महाराष्ट्र सरकारचे दुर्दैव आहे की, त्यांना व्यवसाय आणि प्रेमातले अंतर कधी कळले नाही. याशिवाय पंधराशे रुपयाला या राज्यातलं नातं बिकाऊ नाही? हा आमच्या नात्याचा पूर्णपणे अपमान आहे. कारण निरागस असणाऱ्या बहिण भावाच्या प्रेमाला किंमत लावायचे पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केले आहे.

News Title- Anil patil aginst on Supriya Sule

महत्वाच्या बातम्या-

धोनीसाठी कायपण! CSK ला लवकरच मिळणार खुशखबर?

पाऊस पुन्हा परतला! आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार, यलो अलर्ट जारी

SBI ने करोडो ग्राहकांना दिला झटका, आता तुमचा EMI वाढणार?

iPhone 15 वर मिळतंय तब्बल 9 हजारांचं डिस्काउंट; जाणून घ्या ऑफरबद्दल

विधानसभेपूर्वीच मोदींचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; ‘या’ 3 मोठ्या प्रकल्पांना मंजूरी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now