मुंबई | शिवतीर्थावर सभेसाठी 17 तारखेला मनसेने अर्ज केला आहे. शिवतीर्थावर ही सभा घेऊन राज ठाकरे (Raj Thackeray) कोणाची पोरं कडेवर खेळणार आहेत? कोणाच्या लग्नाच्या वरातीत राज ठाकरे आणि मनसे नाचणार आहे?, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला आहे.
“आता सभा घेऊन कोणाची पोरं खेळवणार”
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं होतं की मी इतरांची पोरं कडेवर खेळवणार नाही. मग आता जर उमेदवार त्यांचा नाही तर शिवतीर्थावर सभा कोणासाठी घेणार आहे?, असा सवाल अनिल परब यांनी केलाय.
आम्ही ज्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्याच दिवशी आम्ही महापालिकेकडे शिवतीर्थ आम्हाला सभेसाठी मिळावे यासाठी अर्ज केला आहे. सगळं काही रेकॉर्डवर आहे. आम्ही रस्त्यावर सभा घेणार नाहीत. आम्हाला आमची स्वतःची पोरं आहेत, अशी टीका परब यांनी केलीये.
महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंच्या सभा
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते प्रचारसभा कधी घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळालं आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भाजपचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारासाठी आपली पहिली सभा घेणार आहेत.
राज ठाकरे (Raj Thackeray) महायुतीच्या प्रचारासाठी राज्यभरात सभा घेणार का, हा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर सिंधुदुर्गात राज ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार आणि कोणावर टीका करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“आमच्या डोक्यात प्रकाश पडायला…”, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला, शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी जाहीर
सर्वात मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने केली आत्महत्या
अखेर ठरलं, ठाण्यात एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का लढणार निवडणूक!






