…अन् रणबीरनं चक्क चाहत्याचा मोबाईलच फेकून दिला, नेटकरीही संतापले

On: January 27, 2023 6:21 PM
---Advertisement---

मुंबई | अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) बाॅलिवूडमधील(Bollywood) एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. रणबीर कपूरसोबत सेल्फी घ्यायला कोणाला नाय आवडणार. पण आता रणबीरसोबत सेल्फी काढणं एका चाहत्याला चांगलंच महागात पडलं आहे.

सध्या रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये(Viral video) जे काही दिसत आहे ते पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर झाला आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रणबीर कपूरसोबत सेल्फी काढायला एक चाहता मोठ्या हौशेने जातो. रणबीर त्याच्यासोबत सेल्फी काढायला उभाही राहतो. परंतु पुढं जे घडलं त्यामुळं तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

तो चाहता सेल्फी काढायला लागतो पण त्याच्या लक्षात येतं की मोबाईलमध्ये काहीतरी प्राॅब्लेम झालाय. मोबाईलला काय झालंय हे पाहण्यासाठी तो चाहता मोबाईलमध्ये पाहतो ना पाहतो तोच रणबीर रागानं त्याच्या हातातील मोबाईल फेकून देतो.

रणबीरचं हे कृत्य नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही. त्यामुळं रणबीरच्या या वागण्यावर नेटकरी कमेंट्स करत त्याला सुनावत आहेत आणि आपला राग व्यक्त करत आहेत.

दरम्यान, काहींच असं मत आहे की हा व्हिडीओ विनोदी आहे. परंतु या व्हायरल व्हिडीओबाबत अद्याप कोणाकडूनही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now