‘मुलगा असताना मी आईच्या खोलीत जाऊन…’; अनाया बांगरचे धक्कादायक खुलासे

On: April 19, 2025 3:13 PM
Anayaa Bangar
---Advertisement---

Anayaa Bangar | भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर (Former Cricketer Sanjay Bangar) यांची मुलगी अनाया बांगर (Anayaa Bangar), जी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीनंतर (Hormone Replacement Therapy) मुलगी बनली आहे, तिने एका मुलाखतीत आपल्या लिंगबदल शस्त्रक्रियेच्या (Gender Reassignment Surgery) निर्णयामागील कारणे आणि प्रवासाविषयी खुलासा केला आहे.

बालपणीची भावना आणि ओळख

एका मुलाखतीत अनायाने सांगितले की, तिला लहानपणापासूनच आपण मुलगी असल्याची भावना होती. “मी आठ-नऊ वर्षांची असताना आईच्या खोलीतून तिचे कपडे घेऊन माझ्या खोलीत आरशासमोर घालून पाहायचे. तेव्हा मला वाटायचे की मी मुलगीच आहे आणि मला मुलगीच व्हायचे आहे,” असे तिने सांगितले.

तिने स्पष्ट केले की, प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या लिंग ओळखीची (gender identity) जाणीव वेगवेगळ्या वयात येते. तिच्यासाठी ही भावना बालपणातच रुजली होती, जरी ती मुलगा म्हणून जन्माला आली होती.

Anayaa Bangar | क्रिकेट, संघर्ष आणि अंतिम निर्णय

अनाया २०२१ पर्यंत मुलगा म्हणूनच क्रिकेट खेळत होती. मात्र, या काळात ती स्वतःच्या ओळखीबद्दल खूप विचार करत होती. लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यास लोक काय म्हणतील, क्रिकेट विश्वात काय प्रतिक्रिया येतील, या विचाराने ती त्रस्त होती. तिला नैराश्य (depression) आले आणि औषधेही घ्यावी लागली.

सामन्यापूर्वी किंवा फलंदाजीला जाण्याआधी ती ड्रेसिंग रूममध्ये लपून रडत असे. अखेरीस, स्वतःबद्दलच्या शंकांमुळे तिला क्रिकेटचाही राग येऊ लागला. “त्यावेळी अखेर मी निर्णय घेतला,” असे सांगत तिने २०२१ मध्ये लिंगबदल करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. ती आता सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Anayaa Bangar Details Her Gender Transition Journey from Aaryan

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now