लिंग बदल्यानंतर पहिल्यांदाच अनाया बांगरने घेतली मित्राची भेट, पोस्ट शेअर करत दिली माहिती

On: April 22, 2025 3:47 PM
anaya bangar
---Advertisement---

Anaya Bangar | भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांच्या मुलीचा म्हणजेच अनाया बांगरचा (Anaya Bangar) सध्या सोशल मीडियावर जोरदार बोलबाला सुरू आहे. लिंग बदल करून मुलगी बनलेल्या अनायाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या जीवनातील कठीण संघर्षाचे आणि काही क्रिकेटपटूंनी केलेल्या वागणुकीचे धक्कादायक खुलासे केले होते.

सरफराज खानसोबत पुन्हा भेट;

अनाया बांगर (Anaya Bangar) आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) यांच्यातील बालपणीपासूनची मैत्री सर्वांनाच माहीत आहे. या दोघांनी नुकतीच एक खास भेट घेतली. 21 एप्रिल रोजी अनाया सरफराजच्या घरी पोहोचली, कारण सरफराजने आपल्या ‘थार’ गाडीचं रिमॉडेलिंग केलं होतं. अनायाने इन्स्टाग्रामवर डिनरदरम्यान घेतलेले फोटो आणि सरफराज व त्याच्या वडिलांसोबतचे क्षण शेअर केले. एका व्हिडिओमध्ये दोघेही बॅट हातात घेतलेले दिसतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

या खास प्रसंगी सरफराज म्हणाला की, “आज दुहेरी आनंद आहे. एक म्हणजे आमच्या थार गाडीचं मॉडिफिकेशन पूर्ण झालं आणि दुसरं म्हणजे अनाया आमच्या घरी आली. आम्ही जवळपास २-३ वर्षांनंतर भेटलो आहोत.” सरफराजने आपल्या कारवर आपला जर्सी क्रमांक ‘97’ देखील लिहून घेतला आहे.

मैत्रीचं प्रतिबिंब; अनाया थारवर, –

अनाया बांगरने (Anaya Bangar) अजून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सरफराजच्या थार गाडीच्या छतावर बसलेली आहे. तिच्या शेजारी सरफराज आहे, आणि ड्रायव्हिंग सीटवर त्याचे वडील आहेत. या पोस्टमध्ये अनायाने लिहिलं आहे, “फोन धरायच्या आधी बॅट धरली होती. आम्ही सुरुवातीपासूनच मित्र आहोत. मुशीर खान, तुझी खूप आठवण येते.”

IPL 2025मध्ये नाही सरफराज-

सरफराज खान सध्या आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये खेळत नाही. मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही संघाने त्याला खरेदी केलं नाही. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने सातत्याने उत्कृष्ट खेळ केला असून त्याचा भारतीय कसोटी संघात समावेश झाला. याउलट, त्याचा छोटा भाऊ मुशीर खान हा पंजाब किंग्स संघाचा भाग आहे.

News Title – Anaya Bangar Reunites With Sarfaraz Khan

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now