Amruta Fadnavis l राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. कारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. मग यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा असो किंवा बदलापूर अत्याचार प्रकरण. मात्र आता देवेंद्र फडणवीस हे वैयक्तिक गोष्टीमुळे प्रचंड चर्चेत आहेत.
देवेंद्र फडणवीस रोमँटिक नाहीत; अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अमृता फडणवीस यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी सोनाली कुलकर्णीने अमृता फडणवीस यांना विचारले की, देवेंद्र फडणवीस रोमँटिक आहेत का? त्यावर अमृता फडणवीस चटकन म्हणाल्या, “नाही. देवेंद्र फडणवीस रोमँटिक नाहीत. आता अमृता फडणवीस यांचे हे उत्तर प्रचंड व्हायरल होत आहे.
अमृता फडणवीस यांनी केलेलं हे वक्तव्य चांगलंच गाजतं आहे. या आधी ददेखील अमृता फडणवीस यांनी एका शोमध्ये देवेंद्र फडणवीस एका वेळी तब्बल 35 पुरणपोळ्या खायचे असं म्हटलं होतं. त्यावेळी महाराष्ट्रभर त्यांच्या या वक्तव्याची चर्चा झाली होती. मात्र आता अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस रोमँटिक नाहीत असं म्हटलं आहे.
https://www.instagram.com/p/C_kJBzLJV0D/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
Amruta Fadnavis l अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या? :
देवेंद्र फडणवीस माझ्यासमोर येतात, जातात. दिसतात रोज पण त्यांचा हात धरुन मला मजा मस्ती कधी करताच येत नाही. कारण धरण उशाला असतं आणि कोरड घशाला.” असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. त्यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने प्रश्न विचारला की, देवेंद्र फडणवीस रोमँटिक आहेत का? त्यावर अमृता फडणवीस चटकन म्हणाल्या की, नाही!
देवेंद्र फडणवीस रोमँटिक नाहीत. लग्नाच्या आधी देखील नाही आणि नंतर देखील नाही, देवेंद्रजी फार प्रॅक्टीकल आहेत. मात्र मी रोमँटिक आहे, त्यांना रोमान्स देखील कळत नाही आणि जमत देखील नाही. त्यांना फक्त राजकारण कळतं. अमृता फडणवीस यांचं हे वक्तव्य प्रचंड चर्चेत आहे. अशातच आता अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर विविध कमेंट येत आहेत.
News Title – amruta fadnavis said devendra fadnavis is not romantic
महत्वाच्या बातम्या-
सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली; धनंजय मुंडेंची खंत अखेर ओठावर
आयफोनप्रेमींनो… जाणून घ्या iPhone 16 सिरिजची किंमत काय असणार?
पुणेकरांसाठी मोठी बातमी! समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार
‘या’ आयुर्वेदिक चहाचे फायदे ऐकून थक्क व्हाल; जाणून घ्या बनवण्याची पद्धत
मनोज जरांगेंच्या विरोधात ‘या’ मराठा नेत्याचे आंदोलन, विचारली या प्रश्नांची उत्तरे






