‘…तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाहीत’; मिटकरींचा मनसे नेत्यांना इशारा

On: August 2, 2024 2:52 PM
MNS Karnabala Dunbale warns Amol Mitkari
---Advertisement---

Amol Mitkari | अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केलेल्या एका वक्तव्यानंतर चांगलाच वाद झालेला आहे. हा वाद थेट अमोल मिटकरींची गाडी फोडण्यापर्यंत पोहोचला. आता यावरून मनसे नेते आणि अमोल मिटकरी आमनेसामने आले आहेत. पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी मनसेवर टीका केली आहे.

“…तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाहीत”

अजितदादांना आता माननीय बोलतोय, उद्या राज ठाकरेंवर टीका झाली, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कपडे फाडू असा इशारा चिलेंनी दिलाय. त्यावरही अमोल मिटकरींनी उत्तर दिलं. अरे, चिल्या तुझे दुधाचे ओठ सुकलेले नसतील. अजितदादांवर टीका केलीना बेट्या तुझ्या राज ठाकरेने तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाहीत, लक्षात ठेव, असं अमोल मिटकरी म्हणाले.

शरद पवार कोर्टात केस जिंकले, तर अजितदादांना कटोरा घेऊन फिरावं लागेल असं योगेश चिले म्हणालेत. याला देखील मिटकरींनी प्रत्युत्तर दिलंय. चिले, पिले, ही बांडगुळ नवीनच ऐकतोय. त्यांची औकात काय? देशपांड्या, चिल्या, खोपकर यांची औकात काय? घरात बायको इज्जत देत नाय आणि हे अजित पवारांवर भुंकायला लागलेत, असं मिटकरी म्हणालेत.

मला पोलीस संरक्षणची गरज नाही. सत्तेतल्या आमदारांला चार चार तास बसावं लागतं. हल्ला करन ही झुंडशाही आहे. माझ्यासारख्याला असा त्रास होत असेल तर सर्वसामान्य लोकांचे काय होत असेल, असं मिटकरींनी म्हटलं आहे.

Amol Mitkari | नेमकं प्रकरणं काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी काल पुण्यात बोलताना बोचरी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं होतं. राज ठाकरे यांचा ‘सुपारीबाज’ असा उल्लेख केला होता. याच कारणामुळे मनसैनिक भडकले. त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला.

अमोल मिटकरी अकोल्यात विश्रामगृहात होते. मिटकरी विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. तेव्हा विश्रामगृहाबाहेर मनसैनिक आले. त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला

महत्त्वाच्या बातम्या- 

लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा त्रस्त?, धक्कादायक सत्य आलं समोर

राज्य सरकारचा करंटेपणा, ॲालिम्पिकला जाण्यापूर्वी स्वप्निलला 50 लाखांची घोषणा करुन रुपयाही दिला नाही!

अटकेच्या भीतीने पूजा खेडकर परदेशी फरार?, मोठी अपडेट समोर

ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा महागलं, 10 ग्रॅमसाठी आता..

राहुल गांधींचा ट्वीट करत गंभीर दावा; देशभर एकच खळबळ

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now