“महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होऊन शिंदे सरकार कोसळेल”

On: January 21, 2023 6:23 PM
---Advertisement---

मुंबई | शिवसेना (Shivsena) पक्ष नेमका कुणाचा आणि पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावरून केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे.

येत्या 30 जानेवारी रोजी यासंदर्भातील महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आतापर्यंत झालेल्या युक्तिवादानुसार, ठाकरे गटाचं पारडं जड असल्याचं म्हटलं जातंय. अशात राष्ट्रवादीच्या नेत्याने केेलेल्या दाव्याने खळबळ माजलीये.

शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadnavis Goverment) काउंटडाउन सुरु झाल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे (Ncp) नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होऊन सरकार (Goverment) कोसळणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. मिटकरींच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे सरकारमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे, असा दावा करणारं ट्विट त्यांनी केलं आहे. येत्या शिवजयंतीपूर्वी महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार, असं भाकित मिटकरींनी वर्तवलं आहे.

19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात राज्यात मोठी उलथापालथ होणार की काय, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now