मुंडेंना पक्षातूनच मोठा धक्का, राष्ट्रवादीचा नेता अजित पवारांना म्हणाला ‘बंदोबस्त करून…’

On: December 24, 2024 7:45 AM
Amol Mitkari big blow to Dhananjay Munde
---Advertisement---

Dhananjay Munde | विधानसभेत महायुतीला जनतेने कौल दिला. निकाल लागल्यानंतर शपथविधी सोहळ्याला बराच कालावधी लागला. सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. काही मंत्रिपदावरून तिन्ही पक्षात रस्सीखेच दिसून आली. त्यानंतर अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथे पार पडला. यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. तर, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्र्यांना खाते वाटप जाहीर झालं. (Dhananjay Munde)

खातेवाटप झाल्यानंतर आता महायुतीमध्ये पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. त्यातच बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे देखील महायुतीला विरोधकांकडून सतत टार्गेट केलं जातंय. या घटनेमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र, मुंडे यांना अजितदादांनी मंत्रीपद दिलंच. अशात राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने केलेल्या वक्तव्याने धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय.

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पालकमंत्रिपदासंदर्भात केलेल्या एका ट्विटमुळे चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांनाच ट्वीटद्वारे टार्गेट केलंय. या ट्वीटमुळे आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय. मिटकरी यांनी केलेलं ट्वीट आता जोरदार व्हायरल होतंय.

अमोल मिटकरी यांचं ट्वीट-

“अजितदादा आपण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होता त्यावेळी कोयतागँग चा बंदोबस्त करुन कायद्याचं राज्य अस्तित्वात आहे हे सिद्ध करुन दाखवलं. यावेळी पुणे जिल्ह्यासोबत बीड व परभणी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारा जेणेकरून परत संतोष देशमुख प्रकरण या राज्यात होणार नाही”, असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

मिटकरी यांनी या ट्वीटद्वारे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. बीडचं पालकमंत्रिपद यावेळी देखील धनंजय मुंडेंना मिळण्याची शक्यता आहे. त्यातच मिटकरी यांनी अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्रिपद स्विकारावं अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता बीडचं पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीये. (Dhananjay Munde)

संतोष देशमुख प्रकरण काय?

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबररोजी अपहरण करण्यात आले, यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. सरपंच हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी गावकऱ्यांकडून मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं. हा मुद्दा आता राजकारणात देखील पेटला आहे. विरोधी गटाकडून या प्रकरणी महायुती सरकारवर हल्लाबोल केला जातोय.तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. (Dhananjay Munde)

News Title – Amol Mitkari big blow to Dhananjay Munde

महत्त्वाच्या बातम्या-

इच्छापूर्ती ते नात्यात गोडवा, आज ग्रहमान ‘या’ राशींना देणार साथ!

‘छगन भुजबळांबद्दल अजित पवारांनीच मला…’, देवेंद्र फडणवीसांकडून मोठा खुलासा!

विनोद कांबळींची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

दलित असल्याने त्याची हत्या पोलिसांनीच केली; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

“एकनाथ खडसे अन् माझे प्रेम आधीपासूनचं”; त्यामुळेच आम्ही… भाजप नेते असं का म्हणाले?

Join WhatsApp Group

Join Now