Assembly Elections 2024 | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. पुढच्या महिन्यात राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. (Assembly Elections 2024 )
गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून विविध मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे नेते अमित ठाकरे देखील निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. इतकंच नाही तर, ते कोणत्या मतदारसंघातून लढणार याबाबतही सर्वकाही ठरलं असल्याचं बोललं जातंय.
अमित ठाकरे निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे हे माहिम मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असं म्हटलं जातंय. मनसेच्या कार्यकर्त्यांकडूनही अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुप, मागठाणे आणि माहिम या तीन मतदारसंघांची निवड करण्यात आली होती.आता ते नेमक्या कोणत्या मतदार संघातून लढणार, याबाबत सर्वांचं लक्ष राहील. (Assembly Elections 2024 )
मात्र, अद्याप मनसेकडून याला दुजारा देण्यात आलेला नाही. तरी, राजकीय वर्तुळात अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अशा जोरदार चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे हे वरळी येथे ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांना आव्हान देणार, असं म्हटलं जात होतं. मात्र, आता ते माहिम मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असं म्हटलं जातंय.
अमित ठाकरेंना शिवसेना पाठिंबा देणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता जर अमित ठाकरे हे निवडणुकीत उतरले तर, त्यांना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळणार काय?, यावर सर्वांचं लक्ष राहील. कारण, आदित्य ठाकरे जेव्हा निवडणुकीसाठी उभे राहिले होते. तेव्हा मनसेकडून त्यांना वरळीत पाठिंबा देण्यात आला होता. 2019 च्या निवडणुकीत मनसेने वरळीत आदित्य ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. (Assembly Elections 2024 )
News Title – Amit Thackery will contest Assembly Elections 2024
महत्त्वाच्या बातम्या-
सणासुदीत ग्राहकांना दिलासा! सोनं झालं स्वस्त?, जाणून घ्या भाव
उद्धव ठाकरेंचा महायुतीला दुहेरी धक्का; दोन बडे नेते शिवसेनेच्या वाटेवर?
आज शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 3 राशींना होणार धनलाभ!
निवडणुकीआधी इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा!
रेल्वेचा मोठा निर्णय! फक्त ‘इतके’ दिवस आधी रेल्वेचं तिकीट बूक करता येणार






