देवेंद्र फडणवीस होणार पुढील मुख्यमंत्री?, अमित शाह यांनी दिले मोठे संकेत

On: November 9, 2024 8:10 AM
Amit Shah Big Statement about Devendra Fadnavis
---Advertisement---

Devendra Fadnavis | राज्यातील विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे देशातील बड्या नेत्यांच्या सभा सध्या वेगवेगळ्या ठिकाणी रंगताना दिसून येत आहेत. महाविकास आघाडीच्या सभेत नुकतीच खासदार राहुल गांधी यांनी हजेरी लावली होती. तर, आता महायुतीचा प्रचार करण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मैदानात उतरले आहेत. मोदी आणि शाह यांच्या हस्ते महायुतीच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी अमित शाह यांनी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

शाह यांनी प्रचार दौऱ्याच्या सुरुवातीलाच फडणवीस यांचे कौतुक केल्याने महायुतीची पुन्हा सत्ता आल्यास नेतृत्व फडणवीस यांच्याकडे सोपविण्याचे संकेत दिल्याचे म्हटले जात आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराजवळ विमानतळ उभारण्याची फडणवीस यांची इच्छा महायुती सरकार सत्तेवर आल्यावर मी पूर्ण करणार असल्याचं मोदी धुळे येथील प्रचारसभेत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय वर्तुळात आता वेगळा अर्थ लावला जात आहे.

काय म्हणाले अमित शाह?

तर, अमित शाह यांनी देखील फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले आहे. ‘मी दीड महिन्यांपूर्वी विदर्भ, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र आदी महाराष्ट्रातील सर्व भागांचा दौरा केला. तेव्हा महायुतीचे सरकार आणायचे आणि फडणवीस यांना विजयी करायचे, हीच तेथील लोकांच्या मनात इच्छा आहे किंवा त्यांनी ठरविले आहे, असे मला जाणवले.’ असं शाह म्हणाले.

प्रचाराच्या पहिल्याच दौऱ्यात मोदी आणि शाह यांनी फडणवीस यांच्याबद्दल केलेली ही विधाने आता चर्चेत आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटात देखील याबाबत आता चर्चा होणे साहजिक मानले जात आहे. गेल्या काही दिवसांत भाजपच्या काही प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही फडणवीस यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केलाय. त्यामुळे महायुती सत्तेत आल्यास पुन्हा एकदा फडणवीस मुख्यमंत्री होणार काय?, याबाबत आता बोललं जातंय. (Devendra Fadnavis)

अजित पवार यांची प्रतिक्रिया काय?

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. जागा कमी लढत असल्यामुळे आम्ही थांबण्यास आणि तडजोडीस तयार असून, तूर्तास महायुतीचं सरकार प्राधान्य असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, या विधानसभेत महायुतीमध्ये   भाजप 152 जागा, शिंदे सेना 85 जागा तर अजित पवार 55 जागांवर निवडणूक लढत आहे. (Devendra Fadnavis

News Title :  Amit Shah Big Statement about Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या –

आज गोपाष्टमी, श्रीकृष्ण कोणत्या राशींना देणार सुख-समृद्धी?; वाचा राशीभविष्य

19 व्या वर्षी पाचव्या मजल्यावरुन मारली उडी?, ‘या’ अभिनेत्रीच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा

दीपिकाचा लेकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

राज ठाकरे एकदा मुख्यमंत्री व्हाच! झळकले बॅनर

महायुतीला 80 टक्के मते मिळवून देण्यासाठी कामाला लागा- संभाजी पाटील निलंगेकर

Join WhatsApp Group

Join Now