अमित शाह यांचं शिवरायांबद्दल पुन्हा वादग्रस्त विधान; म्हणाले, ‘गुलामीच्या काळात..’

On: November 9, 2024 8:47 AM
Amit Shah
---Advertisement---

Amit Shah | समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. सांगलीच्या शिराळ्यामध्ये नुकतीच त्यांची सभा पार पडली. याच सभेत शाह (Amit Shah ) यांनी हे विधान केलंय. यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी यावर संताप व्यक्त करत आक्षेप घेतला आहे.

रामदास स्वामी महान असतील पण त्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध जोडू नये, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. यावरच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत यांनीही अमित शाहांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप केलाय. अमित शाहांनी शिवरायांच्या इतिहासात समर्थ रामदासांचा उल्लेख केला, हा इतिहासाचा संदर्भ चुकीचा असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

काय म्हणाले अमित शाह?

सत्यजित देशमुख, निशिकांत पाटील यांच्या प्रचारासाठी अमित शाह आले होते. त्यांच्यासाठी घेतलेल्या सभेत शाह म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने बत्तीस शिराळामधील नागपूजा बंद केली. मात्र, आमचे सरकार आले की ती पुन्हा विधिवत सुरू केली जाणार. कायद्याचा सन्मान राखून नागपंचमी ही परंपरेनुसार साजरी होईल.

“समर्थ रामदास यांचे पाऊल जिथे पडले ही ती पवित्रभूमी आहे. रामदास यांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून शिवाजी महाराज यांना पाठिंबा दिला होता. महाराष्ट्राची ही वीरभूमी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर यांची भूमी आहे. आता 20 तारखेला तुम्हाला निर्णय घ्यायचाय.”, असंही शाह (Amit Shah ) म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीकडून आक्षेप घेतला जात आहे.

शाह यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत दिले मोठे संकेत

यावेळी शाह (Amit Shah ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील कौतुक केले. ‘मी दीड महिन्यांपूर्वी विदर्भ, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र आदी महाराष्ट्रातील सर्व भागांचा दौरा केला. तेव्हा महायुतीचे सरकार आणायचे आणि फडणवीस यांना विजयी करायचे, हीच तेथील लोकांच्या मनात इच्छा आहे किंवा त्यांनी ठरविले आहे, असे मला जाणवले.’ असं शाह म्हणाले. त्यांच्या या विधानाचा आता राजकीय वर्तुळात वेगळा अर्थ लावला जात आहे. शाह यांनी प्रचार दौऱ्याच्या सुरुवातीलाच फडणवीस यांचे कौतुक केल्याने महायुतीची पुन्हा सत्ता आल्यास नेतृत्व फडणवीस यांच्याकडे सोपविण्याचे संकेत यातून दिल्याचे म्हटले जात आहे.

News Title :  Amit Shah Big Statement

महत्वाच्या बातम्या –

देवेंद्र फडणवीस होणार पुढील मुख्यमंत्री?, अमित शाह यांनी दिले मोठे संकेत

आज गोपाष्टमी, श्रीकृष्ण कोणत्या राशींना देणार सुख-समृद्धी?; वाचा राशीभविष्य

19 व्या वर्षी पाचव्या मजल्यावरुन मारली उडी?, ‘या’ अभिनेत्रीच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा

दीपिकाचा लेकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

राज ठाकरे एकदा मुख्यमंत्री व्हाच! झळकले बॅनर

Join WhatsApp Group

Join Now