मोठी बातमी! अंबरनाथ MIDC कंपनीत गॅस गळती, केमिकल धूराने नागरिक त्रस्त

On: September 13, 2024 8:29 AM
Ambernath MIDC morivali Gas leakage
---Advertisement---

Ambernath MIDC | ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत रायासायनिक कंपनीतून गॅस गळती झाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात केमिकलचा धूर पसरला. या वायूगळतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या केमिकलचा धूर रेल्वे रुळावरही पसरल्याने येथे दृश्यमानता कमी झाली. या भागात गुरुवारी रात्री उशीरा वायूगळती झाली. (Ambernath MIDC)

यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात (Ambernath News) धुराचे साम्राज्य पसरले होते. शहरात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने अनेक नागरिकांना त्रास झाल्याची माहिती आहे. मात्र, हा धूर किंवा वायू कसा पसरला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अंबरनाथ MIDC केमिकल कंपनीतून वायू गळती

काल (12 सप्टेंबर) रात्री दहा वाजेच्या सुमारास मोरिवली एमआयडीसीच्या परिसरात उग्र वास येऊ लागला. यामुळे अनेक नागरिकांना त्रास झाला. याचवेळी अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तपास आणि चौकशी केली असता एमआयडीसीतील कोणत्याही कंपनीतून गॅस सोडण्यात आला नाही, असं सांगण्यात आलं. (Ambernath MIDC)

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मात्र, शहरात पसरलेल्या धुरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, निकाकेम केमिकल कंपनीतून केमिकल हवेत पसरल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. बऱ्याच जणांना घशात खवखव आणि डोळ्यात जळजळ असा त्रास झाला. (Ambernath MIDC)

वायू प्रदूषण मंडळाच्या मोबाईल व्हॅनकडून सध्या हवेची तपासणी सुरु आहे. नेमका वायू कोणता आहे याची तपासणी करण्याचे काम सुरु आहे. तसेच परिस्थिती आटोक्यात आली असून घाबरून जाण्याची गरज नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

News Title :  Ambernath MIDC morivali Gas leakage

महत्वाच्या बातम्या-

देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 3 राशींच्या आर्थिक समस्या दूर होतील!

अजित पवारांचा सल्लाही फाट्यावर मारला, लेक थेट बापाविरूद्ध उभी ठाकणार

खडसे निष्ठा सिद्ध करणार का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनचं आव्हान!

मलायका आरोराच्या वडिलांची हत्या?, पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टने बाॅलिवूड हादरलं

राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गटात रोहित पवार बॅकफूटवर, ‘या’ गोष्टी नडल्या?

Join WhatsApp Group

Join Now