कंबोज म्हणाले; “गजाभाऊला उचलून आणणार”; ठाकरे गटाचा नेता म्हणाला…

On: December 3, 2024 11:17 AM
Mohit Kamboj Vs Gajabhau
---Advertisement---

Mohit Kamboj l मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपूर्वीच राजकीय वर्तुळात मोहित कंबोज यांच्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी अकाऊंटला टॅग करत धमकी दिल्याचं दिसून येत आहे.

अंबादास दानवेंनी पोस्ट काय? :

यासंदर्भात माहिती अशी की, मोहित कंबोज यांच्या या पोस्टमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मोहित कंबोज यांनी गजाभाऊ नावाच्या एका एक्स युजरला टॅग करत पोस्ट केली आहे, मात्र त्यामध्ये त्यांनी थेट धमकी दिल्याचं दिसून येत आहे. मोहित कंबोज यांनी गजाभाऊ नावाच्या युजरला टॅग करून ही पोस्ट लिहली आहे. यामध्ये त्याने देखील मोहित कंबोज यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. मात्र आता यावरून विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.

मोहित कंबोज यांची पोस्ट शेअर करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपला देखील धारेवर धरलं आहे. यावेळी अंबादास दानवे यांनी ‘या असल्या कारभाऱ्यांनी भाजपचे ‘कंभोजीकरण’ झाले असल्याचं म्हंटल आहे. तसेच तत्ववादी नेत्यांचा पक्ष आज ‘ह्याला उचल, त्याला उचल’ची भाषा करत आहे. मात्र हे त्यांना अजिबात शोभत नाही. कारण महाराष्ट्रात अश्या धमक्यांना थारा नाही, त्यामुळे मराठी माणसाबद्दल तर अजिबातच नाही! तसेच फिकर नॉट गजाभाऊ’, अशी पोस्ट त्यांनी लिहली आहे. तर कंबोज ज्या अकाऊंंटला टॅग करून धमकीवजा पोस्ट लिहली आहे, त्याला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे काळजी करू नका असं म्हंटल आहे.

https://twitter.com/mohitkamboj_/status/1863268323540283512

Mohit Kamboj l नेमकं प्रकरण काय आहे? :

राज्याच्या राजकारणावर गजाभाऊ आणि भाऊ गँग नावाचे एक्स हँडल्स हे वारंवार पोस्ट करत असतात. मात्र त्यांनी वारंवार महायुती, भाजप, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात पोस्ट शेअर केल्याचं दिसून आलं. तसेच या पोस्टवरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी त्या अकाऊंटला टॅग करत आता निवडणुकीनंतर धमकी दिल्याचं दिसून येत आहे.

 

मोहित कंबोज यांची नेमकी पोस्ट काय? :

‘माझं पुढचं टार्गेट गजाभाऊ’ असं म्हणत भाजप नेते मोहित कंबोज यांनी @gajabhauX या एक्स आयडीला देखील टॅग केलं आहे. तर पुढे ‘धरती पे किधर भी होगे , उठा के लाए गे !’ असा थेट इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे. याशिवाय ‘हर हर महादेव’ असं लिहून ही पोस्ट सेव्ह करुन ठेवा असं देखील मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. तसेच त्या पोस्टवर गजाभाऊ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन मोहित कंबोज यांना उत्तर देण्यात आलं आहे. यावेळी मोहित कंबोज यांच्या ट्विटवर खाली गजाभाऊ या अकाऊंटने उत्तर देताना, “येताना एकटा येऊ नकोस बापाला संगती घेऊन ये… मी पण वाट बघतोय…”, असं देखील लिहलं आहे.

News Title – Ambadas Danve on Mohit Kamboj Post

महत्त्वाच्या बातम्या-

लग्नसराईत सोन्याची आनंदवार्ता; ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

अखेर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर?; आज खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी?, संभाव्य नावे समोर

आज विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

“त्यांच्यामुळे माझं लग्न…”, लग्नाबद्दल प्राजक्ता माळीचा नवा खुलासा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now