एकाच रात्रीत अल्लू अर्जुन तुरुंगातून सुटला, आता पुढील कारवाई काय?

On: December 14, 2024 8:38 AM
Allu Arjun
---Advertisement---

Allu Arjun | तेलुगु सिनेमा क्षेत्रातील सुपरस्टार अल्लू अर्जुन याची अखेर तुरुंगातून सुटका झाली आहे. तेलंगणा हायकोर्टने त्याला 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी काल (13 डिसेंबर) अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. अखेर आज सकाळी त्याची तुरुंगातून सुटका झाली. या वृत्ताने अभिनेत्याच्या (Allu Arjun) चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कनिष्ठ न्यायालयाने त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली होती, मात्र त्यानंतर त्याला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. त्याला जामीन काल रात्रीच मिळाला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत कारागृह प्रशासनाला जामिनाची प्रत न मिळाल्याने अल्लू अर्जुनला संपूर्ण रात्र कारागृहातच काढावी लागली.कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशानंतर अल्लू अर्जुनला चंचलगुडा तुरुंगात पाठवण्यात आले होते. आज सकाळी त्याची सुटका झाली.

नेमकं प्रकरण काय?

देशभरासह अनेक देशांत रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ ची क्रेझ अजूनही कायम आहे. 4 डिसेंबर चित्रपट सिनेमा गृहात रिलीज झाला होता. हा चित्रपट बघण्यासाठी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, यावेळी सिनेमागृहात अभिनेता अल्लू अर्जुन येणार, अशी माहिती समजली. अल्लू अर्जुन येणार असल्याचे समजताच सिनेमागृहात चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. मात्र तो कधी येईल याची कोणतीही माहिती सिनेमागृहाच्या व्यवस्थापकांकडून किंवा कलाकारांच्या टीमकडून पोलिसांना देण्यात आली नाही.

रात्री 9.30 च्या सुमारास अल्लू अर्जुन याने संध्या थिएटरमध्ये प्रवेश केला. यावेळी जमलेल्या सर्व लोकांनीही त्याच्यासोबतच आत येण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी अल्लू अर्जुन याच्या वैयक्तिक सुरक्षा पथकाने लोकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यामुळे येथे  परिस्थिति चिघळली. अचानक झालेल्या गर्दीमुळे येथे चेंगराचेंगरी झाली. अभिनेता येणार होता, अशी माहिती असताना देखील थिएटर व्यपस्थापनाने त्यांच्यासाठी वेगळा प्रवेश किंवा जाण्यासाठी वेगळा मार्ग केला नव्हता, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचं बोललं जातंय. (Allu Arjun)

या गर्दीतच अल्लू अर्जुनचा चित्रपट पाहण्यासाठी आलेली महिला रेवती आणि तिचा मुलगा या दोघांचा जीव घुसमटला. तिथे ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना कसंबस बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात नेलं. मुलावर नजीकच्या दुर्गाबाई देशमुख हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.मात्र, त्याची आई, रेवती यांचा घुसमटून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापक, अभिनेता अल्लू अर्जुन तसेच त्याची सुरक्षा टीम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामुळे काल अल्लू अर्जुनला (Allu Arjun)अटक झाली होती.

News Title – Allu Arjun released from jail

महत्त्वाच्या बातम्या-

आज दत्त जयंती, श्री दत्त गुरूंची ‘या’ राशींवर असणार अपार कृपा!

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली; संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनला अटक, धक्कादायक कारण आलं समोर

‘…तर महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता होऊ शकते’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा इशारा

एकनाथ शिंदेंच्या खुर्चीला इतिहासात महत्त्व राहिलेलं नाही; शिंदेंच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

Join WhatsApp Group

Join Now