शाहरुख खानमुळे ‘पुष्पा’ एका दिवसात जेलमधून बाहेर; किंग खानने काय खेळी खेळली?

On: December 14, 2024 9:13 AM
Allu Arjun got Interim Bail bases of shah rukh khan case
---Advertisement---

Allu Arjun | ‘पुष्पा 2’ चित्रपटामुळे चर्चेत आलेला अभिनेता अल्लू अर्जुन हा सध्या एका प्रकरणामुळे अडचणीत सापडला आहे. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी काल (13 डिसेंबर) अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळीच त्याची तुरुंगातून सुटका झाली. या वृत्ताने अभिनेत्याच्या (Allu Arjun) चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, एकाच रात्रीत अभिनेत्याला जामीन कसा मिळाला?, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अशात एक मोठी माहिती समोर येत आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि पत्रकार अर्णब गोस्वामीमुळे अल्लू अर्जुनला हा जामीन मिळाला असल्याची माहिती आहे. यामागे नेमका काय संदर्भ आहे?, ते सविस्तर समजून घेऊयात.

अल्लू अर्जुनची एका रात्रीत सुटका कशी?

अभिनेता अल्लू अर्जुनला काल संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली होती. ‘पुष्पा 2’ चित्रपट थिएटरमध्ये अल्लू अर्जुन आला असता तेथे एकच गर्दी उसळली होती. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. त्यावेळी चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच, महिलेसोबत असलेला लहान मुलगा देखील गंभीर जखमी झाला. याच प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाली होती. मात्र, आज सकाळीच त्याची तुरुंगातून सुटका झाली. (Allu Arjun)

अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, त्याला आता अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. सत्र न्यायालयाने अल्लू अर्जुनला ही न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यावर तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणासाठी अल्लू अर्जुनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात अल्लू अर्जुनला शाहरुख खानशी सबंधित एका प्रकरणाच्या आधारावर जामीन मिळाला.

शाहरुख खानचा या प्रकरणाशी काय संबंध?

अभिनेत्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनावेळी अभिनेता शाहरुख खानला बघण्यासाठी प्रचंड जमाव जमला होता. या गर्दीच्या दिशेने शाहरुखने तेव्हा काही टी-शर्ट फेकली होती. त्यामुळे एकच पळापळ झाली. या धावपळीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र, नंतर सुप्रीम कोर्टाने शाहरुखची निर्दोष सुटका केली होती.

तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या खटल्याच्या आधारावर सुद्धा अल्लू अर्जुन जामिनासाठी पात्र ठरला. या दोन्ही प्रकरणाच्या आधारावर अल्लू अर्जुनला एका दिवसात जामीन मिळाला. म्हणजेच, किंग खानमुळे अल्लू अर्जुनची (Allu Arjun) एका रात्रीतून सुटका झाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

News Title –  Allu Arjun got Interim Bail bases of shah rukh khan case

महत्त्वाच्या बातम्या-

एकाच रात्रीत अल्लू अर्जुन तुरुंगातून सुटला, आता पुढील कारवाई काय?

आज दत्त जयंती, श्री दत्त गुरूंची ‘या’ राशींवर असणार अपार कृपा!

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली; संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनला अटक, धक्कादायक कारण आलं समोर

‘…तर महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता होऊ शकते’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा इशारा

Join WhatsApp Group

Join Now